पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू काश्मीर Video: CRPF जवानांनी नदीत बुडणाऱ्या मुलीला वाचवले

जवानांनी वाचवले मुलीचे प्राण

जम्मू काश्मीर येथील बारामुल्ला जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांनी नदीत बुडणाऱ्या एका चौदा वर्षांच्या मुलीचा जीव वाचवला. सोमवारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक मुलगी नदीत बुडत असल्याचे निदर्शनास येताच परिस्थिती लक्षात घेवून जवानाने कोणतीही तमा न बाळगता नदीत उडी मारुन मुलीला सुखरुप बाहेर काढले.

जवानाच्या तत्परतेन मुलीचा जीव वाचवण्यात यश आले, अशी माहितीही सीआरएफच्या अधिकाऱ्याने एएनआयशी बोलताना दिली.  नगीना तंगमार्ग परिसरातून वाहणाऱ्या नदीच्या किनाऱ्यावरुन पाय घसरुन ही मुलगी नदीत पडली होती. नदीचा वेगाने वाहणाऱ्या प्रवाहासोबत ती वाहून जात असताना मुलीला वाचवण्यासाठी दोन जवानांनी नदीत उडी मारली.

घाटकोपरमध्ये ऑनर किलिंग; पित्यानेच केली मुलीची हत्या

दोन जवानाच्या टीमने नदीच्या वाहत्या दिशेने धाव घेतली. एम जी नायडू आणि एन. उपेंद्र या दोघांच्या टीमने मुलीला सुखरुप बाहेर काढले. त्यानंतर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.  हे दोन्ही जवान सीआरपीएफच्या १७६ बटालियनचे आहेत. जीवाची बाजी लावून मुलीला वाचवणाऱ्या जवानांना प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्हाने गौरवण्यात येणार असल्याची घोषणा बटालियनच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.