पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसला आणखी एक धक्का, तेलंगणामध्ये १२ आमदार फुटले

के. चंद्रशेखर राव

तेलंगणामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या १२ आमदारांनी पक्षातून बाहेर पडून तेथील सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला आहे. तेलंगणा विधानसभेत काँग्रेसचे १९ आमदार आहेत. त्यापैकी १२ आमदार बाहेर पडल्यामुळे त्यांच्यावर पक्षांतरविरोधी कायद्यानुसार कारवाईही करता येणार नाही. त्यामुळे त्यांचे पक्षांतर वैध ठरणार आहे. एकीकडे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी त्यांच्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे सांगितले जात असताना दुसरीकडे पक्षातील स्थानिक नेत्यांमध्येही अस्वस्था असल्याचे दिसून येऊ लागले आहे.

प्रयोग दरवेळी यशस्वी होतातच असे नाही - अखिलेश यादव

तेलंगणामधील विधानसभेत एकूण ११९ जागा आहेत. त्यापैकी १९ जागांवर गेल्या निवडणुकीत काँग्रेसने यश मिळवले होते. निवडणुकीच्या निकालानंतरच एकामागून एक काँग्रेसचे आमदार तेलंगणा राष्ट्र समितीच्या मार्गावर होते. ११ जणांनी तेलंगणा राष्ट्र समितीला पाठिंबा दिला होता. पण त्यांनी अधिकृतपणे काँग्रेसला रामराम ठोकला नव्हता. 

गुरुवारी रंगारेड्डी जिल्ह्यातील तांदूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे आमदार पी. रोहित रेड्डी यांनी तेलंगणा राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष के टी रामाराव यांची भेट घेतली आणि तेलंगणा राष्ट्र समितीला आपला पाठिंबा जाहीर केला. यामुळे तेलंगणा राष्ट्र समितीला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांची संख्या १२ झाली. 

विमान वाहतूक घोटाळाः प्रफुल्ल पटेल यांची ईडीच्या चौकशीला गैरहजेरी

के टी रामाराव यांनी गुरुवारी काँग्रेसच्या १२ आमदारांना त्यांच्या निवासस्थानी भोजनासाठी निमंत्रित केले होते. तिथेच त्यांनी त्यांच्या विधीमंडळ पक्षाची औपचारिक बैठक घेतली आणि त्यात हे सर्व १२ आमदार तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये सहभागी होत असल्याचा ठराव केला. तो एकमताने मंजूर करण्यात आला.