पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पहलू खान झुंडबळी प्रकरण; प्रियांका गांधींविरोधात गुन्हा दाखल

प्रियांका गांधी

काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहारच्या मुझफ्फरपूरमधील सीजेएम न्यायालयात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजस्थानमध्ये पहलू खान झुंडबळी प्रकरणी त्यांनी एक ट्विट केले होते. या ट्विटवरुनच एका वकिलाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

पहलू खान झुंडबळी प्रकरणातील सर्व सहा आरोपींची अलवर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर प्रियांका गांधी यांनी शुक्रवारी ट्विट करत न्यायालयाचा निर्णय कौतुकास्पद असल्याचे म्हटले होते. त्यांनी ट्विटमध्ये असे म्हटले होते की, 'न्यायलयाने दिलेला निर्णय धक्कादायक आहे. जमावाने केलेल्या हत्येविरोधात कायदा करण्याचा राजस्थान सरकारचा पुढाकार कौतुकास्पद आहे. पहिलू खान प्रकरणामध्ये न्याय देऊन सरकार एक उत्तम उदाहरण स्थापन करेल अशी आशा आहे.'

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा रवी शास्त्रींची निवड

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट 

प्रियांका गांधी यांच्या या ट्विटनंतर बिहारच्या मुझफ्फरपूर सीजेएम न्यायालयातील वकील सुधीर ओझा यांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. धार्मिक द्वेष पसरवणे आणि न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केल्याचा आरोप करीत सुधीर ओझा यांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रियांका गांधी यांच्याविरोधात कलम ५०४, ५०६ आणि १५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, १ एप्रिल २०१७ रोजी राजस्थानमध्ये गायींची वाहतूक करणाऱ्या पहलू खानची जमावाने हत्या केली होती. 

पश्चिम महाराष्ट्रात पूरामुळे आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:criminal case registered against congress leader priyanka gandhi vadra in muzaffarpur CJM court