पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेस

नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अपेक्षित कामगिरी न झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीला (भाकपा) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमवावा लागण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाकडून येत्या काही दिवसांत या राजकीय पक्षांना 'कारणे दाखवा नोटीस' बजावण्याची शक्यता आहे. तुमचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा का काढू नये, असा सवाल त्यात केला जाऊ शकतो. 

राष्ट्रवादीचे आणखी चार आमदार भाजप-शिवसेनेच्या वाटेवर

भाकपा, बसपा आणि राष्ट्रवादीवर २०१४ मध्येही लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीनंतर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावण्याची भीती निर्माण झाली होती. पण २०१६ मध्ये निवडणूक आयोगाने आपल्या नियमांमध्ये दुरुस्ती करत राजकीय पक्षांची राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय दर्जाची समीक्षा ५ ऐवजी १० वर्षांनी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक पक्षांना दिलासा मिळाला होता. 

बसपाकडे सध्या १० लोकसभा आणि काही विधानसभेच्या जागा आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर राष्ट्रीय दर्जा गमावण्याचे संकट नाही. निवडणूक प्रतीक (आरक्षण आणि वाटप) आदेश, १९६८ अंतर्गत एखाद्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष तेव्हाच मानले जाते. जेव्हा त्यांचे उमेदवार लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत चार किंवा अधिक राज्यांमधून किमान ६ टक्के मते मिळवतील. 

वंचित बहुजन आघाडीची मतपत्रिकांच्या साह्याने निवडणूक घेण्याची मागणी

त्याचबरोबर लोकसभेत त्यांचे किमान ४ खासदार असावेत. त्यांच्याकडे लोकसभेच्या एकूण जागांपैकी किमान २ टक्के जागा असाव्यात आणि त्यांचे उमेदवार किमान तीन राज्यांमधून आलेले असावेत.