पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कन्हैयाकुमारच्या ताफ्यावर आठव्यांदा हल्ला, वाहनांचे नुकसान

कन्हैया कुमार

जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि सीपीआयचा नेता कन्हैयाकुमारच्या ताफ्यावर पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला आहे. विटा-दगडाने केलेल्या या हल्ल्यात कन्हैयाच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. कन्हैयाकुमार हे आरा येथील रमना मैदानावर सभेसाठी जात होते. त्याचवेळी काही समाजकंटकांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. कन्हैयाकुमारच्या ताफ्यावर झालेला हा आठवा हल्ला असल्याचे त्याच्याबरोबर असलेल्या लोकांनी सांगितले. 

केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना दिले शपथविधीचे निमंत्रण

कन्हैयाकुमारने टि्वटमध्ये म्हटले की, आज जण-गण-मन यात्रेचा ताफा बक्सरमध्ये सभा केल्यानंतर आरा येथे आला होता. गोडसे प्रेमींनी आरा येथे होणाऱ्या सभेच्या मंचाला काल रात्री आग लावली. पण 'हम तो जाएँगे मोहब्बत का कारवाँ लेकर और लगाएँगे नफ़रत से आज़ादी के नारे।' इंक़लाब मंच का मोहताज नही होता दोस्तों। 

VIDEO: एकमेकांचा पाठलाग करत काँग्रेस कार्यकर्त्यांची हाणामारी

प्राप्त माहितीनुसार, कन्हैयाचा ताफा कार्यक्रमस्थळाकडे जात होता. त्याचवेळी दुचाकीवर आलेल्या काही समाजकंटकांनी विटा-दगड वाहनांवर टाकण्यास सुरुवात केली. त्यानंतर ताफ्याबरोबर असलेल्या पोलिसांनी कन्हैयाला दुसऱ्या गाडीत बसवून रमना मैदानाकडे पाठवले. या हल्ल्यात कन्हैयाकुमारला दुखापत झालेली नाही. यापूर्वी १२ फेब्रुवारी रोजीही कन्हैयाच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. कन्हैया सध्या जन गण मन दौऱ्यावर आहे. मागील महिन्यात सुरु झालेली ही यात्रा पाटणात एक विशेष रॅलीनंतर सपुष्टात येईल.

... आणि कृषिमंत्री पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर