पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमेरिका एक-एक मृत्यूचा बदला घेणार?, ट्रम्प यांनी दिली चीनला धमकी

डोनाल्ड ट्रम्प

कोरोनाचे थैमान सुरु असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला धमकी दिली आहे. कोरोना विषाणू जगभर पसरण्यास चीन जबाबदार आहे. त्यांना याची माहिती होती. याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, अशा शब्दांत त्यांनी चीनला फटकारले आहे. चीनने यावरुन अमेरिकेबरोबर पारदर्शक व्यवहार केला नाही. तसेच सुरुवातीला सहकार्यही केला नसल्याचा आरोप, ट्रम्प यांनी केला आहे. 

ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये उद्योगांना सशर्त परवानगीः उद्धव ठाकरे

ट्रम्प यांची चीनला धमकी

शनिवारी व्हाईट हाऊस येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जर ते (चीन) जाणूनबुजून हा विषाणू पसरवण्यास जबाबदार असल्याचे समोर आले तर त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. १९१७ नंतर कोणीच इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याचे पाहिलेले नाही, असे ते म्हणाले. 

त्यांनी म्हटले की, कोविड-१९ जगभरात पसरण्यापूर्वी चीनबरोबर आमचे संबंध चांगले होते. परंतु, या प्रकारामुळे आता खूप फरक पडला आहे. चीनवर आपण नाराजही असल्याचे त्यांनी सांगितले. 

राज्यातील ९५ टक्के चाचण्या निगेटिव्हः उद्धव ठाकरे

कोरोना विषाणूच्या संकटामुळे प्रत्येकाचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत जगात सर्वांत मोठी आमची अर्थव्यवस्था होती. चीन आमच्या आसपासही नव्हता, हे सांगताना ते पुढे म्हणाले की, इराण आधीपेक्षा एक अत्यंत वेगळा देश झाला आहे. पूर्वी इराण पश्चिम आशियावर आपला अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करत होता. आता तो फक्त जगू इच्छितो, अशा शब्दांत अप्रत्यक्ष इशारा त्यांनी दिला.