पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारताबरोबर लॉकडाऊनची घोषणा करणाऱ्या न्यूझीलंडमध्ये कोरोना नियंत्रित

कोरोना विषाणूबाधित रुग्णावर उपचार सुरु असतानाचे संग्रहित छायाचित्र

चीनमधून पसरलेला कोरोना विषाणूचा भारतात वेगाने फैलाव होताना दिसत आहे. देशात कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला होता. आता त्याचा कालावधी वाढवण्याबाबत सरकारचा विचार सुरु आहे. भारतात कोरोना विषाणूचे संक्रमण सातत्याने वाढताना दिसत आहे. परंतु, जगातील एक देश असाही आहे, ज्याने भारताबरोबरच लॉकडाऊनची घोषणा केली होती आणि त्या देशातील परिस्थिती भारतापेक्षा चांगली सुधारत आहे. 

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात भारत मोठ्या प्रमाणात यशस्वी, तरीही...

न्यूझीलंडमध्ये सलग चौथ्यादिवशी घसरण

दरम्यान, भारत आणि न्यूझीलंडमध्ये एकाच दिवशी कोरोना विषाणूविरोधात युद्ध पुकारत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. न्यूझीलंडने कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवले आहे. तिथे या प्रकरणात घसरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे भारतात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. मागील एक आठवड्याच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दररोज रुग्णांच्या संख्येत ५००पेक्षा जास्त वाढ झाली आहे. तर न्यूजीलंडमध्ये सलग चौथ्या दिवशी या प्रकरणांमध्ये घसरण पाहावयास मिळाली. 

सांगलीतील २४ रुग्ण कोरोनामुक्त, मंत्र्यांकडून डॉक्टरांचे अभिनंदन

दोन्ही देशात एकाच दिवशी लॉकडाऊन

गुरुवारी न्यूझीलंडमध्ये फक्त २९ प्रकरणे समोर आली. तर भारतात हा आकडा ५९० च्या जवळ होता. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अडर्न यांनी ४ आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊनची घोषणा केली होती. भारताप्रमाणेच न्यूझीलंडमध्येही सर्व काही बंद आहे. रेशन, भाजीपाला आणि औषधांची दुकाने वगळता तिथेही सर्वकाही बंद आहे. 

न्यूझीलंड आणि भारत दोन्हीकडे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आहेत. दोन्ही देशांनी आपले नागरिक घरात कैद केले आहेत. तरीही भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या भारतात ६४००च्या वर गेली आहे. तर न्यूझीलंडमध्ये हा आकडा १२०० पर्यंत मर्यादित आहे. न्यूझीलंडने यावर नियंत्रण मिळवण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तेथील मर्यादित लोकसंख्या.

कोरोनाविरोधातील लढाईत भारताचे महत्त्वाचे पाऊल

दोन्ही देशातील लोकसंख्येत मोठे अंतर

न्यूझीलंडची लोकसंख्या केवळ ५० लाख आहे. जी दिल्लीच्या लोकसंख्येच्या एक तृतीयांश आहे. कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी भारतासमोर सर्वांत मोठी समस्या ही सुमारे १३० कोटी लोकसंख्या आहे. न्यूझीलंडमध्ये जेव्हा २९ प्रकरणांची नोंद केली होती. तेव्हा १९ मार्चलाच त्यांनी विदेशींना प्रवेश बंद केला होता. भारतानेही १२ मार्चच्या आसपास विदेशींच्या प्रवेशाला बंदी घातली होती. परंतु, भारतात येणाऱ्या विदेशी लोकांची संख्या ही न्यूझीलंडपेक्षा जास्त आहे. 

भारतात नियमांचे पालन करण्यात ढिलाई

न्यूझीलंडने कोरोना विषाणूपासून बचावासाठी कडक पावले उचलली. भारतानेही कलम १४४ लागू केले. २२ मार्चला जनता कर्फ्यू करण्यात आला. परंतु, न्यूझीलंडमध्ये सेल्फ आयसोलेशनचे महत्त्व आणि लॉकडाऊन गंभीरतेने घेण्यात आले. भारतात हे कमीच पाहायला मिळाले. कोरोनावर सोशल डिस्टन्सिंगशिवाय सध्या कोणताच इलाज नाही. 

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १,३८० वर, ९७ रुग्णांचा मृत्यू

तबलिगी जमात हेही एक कारण

भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ झाली. यातील महत्त्वाचे कारण तबलिगी जमातीचे प्रकरण हेही आहे. स्वतः आरोग्य मंत्रालयाने तबलिगी जमातीमुळे सुमारे ३० ते ३५ टक्के रुग्ण वाढल्याचे म्हटले आहे. मरकजमध्ये सहभागी झालेल्या जमातीमुळे भारतात कोरोना विषाणूचे रुग्ण वेगाने वाढले. न्यूझीलंडमध्ये अशा स्वरुपाची घटना आढळलेली नाही. न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात २०० हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Covid19 New Zealand recorded a decline in new coronavirus cases but India reports Increase while Both announced lockdown on same day know reason