कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनदरम्यान मद्यव्यापारी विजय मल्ल्याने पुन्हा एकदा आपले कर्ज फेडण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. विजय मल्ल्याने मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना उद्देशून एक टि्वट केले आहे. त्याने म्हटले आहे की, कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या काळात दिवाळखोर झालेल्या किंगफिशर एअरलाइन्सकडून घेण्यात आलेले १०० टक्के कर्ज फेडण्याच्या माझ्या प्रस्तावाचा विचार करावा.
कोरोना इम्पॅक्ट : सरकारी कर्मचाऱ्यांच्या, आमदारांच्या वेतनात मोठी कपात
भारतातील बँकांना सुमारे ९००० कोटी रुपयांचा चुना लावून गेलेल्या विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. लॉकडाऊननंतर आपल्या सर्व कंपन्यांचे काम आणि उत्पादन बंद करण्यात आल्याचे मल्ल्याने म्हटले आहे.
I have made repeated offers to pay 100 % of the amount borrowed by KFA to the Banks. Neither are Banks willing to take money and neither is the ED willing to release their attachments which they did at the behest of the Banks. I wish the FM would listen in this time of crisis.
— Vijay Mallya (@TheVijayMallya) March 31, 2020
विजय मल्ल्याने आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, मी केएफएसाठी बँकांकडून घेतलेले कर्ज १०० टक्के फेडण्यासाठी वारंवार प्रस्ताव दिला आहे. बँक पैसे घेण्यास तयार नाही आणि ईडी माझी संपत्ती ताब्यात घेण्यासाठी सज्ज आहे. यावेळी अर्थमंत्री माझे म्हणणे ऐकतील अशी अपेक्षा आहे.
धन्य निर्णय! कोरोनाशी लढण्यासाठी डॉक्टरांना दिले रेनकोट, सनग्लासेस
तो पुढे म्हणाला की, भारत सरकारने संपूर्ण देश बंद करण्याचा जो निर्णय घेतला होता. तो अकल्पनीय होता. आम्ही त्याचा सन्मान करतो. माझ्या सर्व कंपन्यांनी त्यांचे कामकाज बंद केले आहे. उत्पादनेही बंद आहेत. आम्ही कर्मचाऱ्यांना घरी पाठवत नाहीये. यासाठी सरकारला मदत करावी लागेल.
यावेळी मल्ल्याने लोकांना घरी राहण्यास आणि सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन केले आहे. आपणही याची अंमलबजावणी करत असल्याचे त्याने सांगितले.
व्हा सावध!, पीएम केअर्स फंडच्या नावाने बनावट वेबसाइट्स सक्रिय