पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाचा आशियातील सर्वात मोठ्या देहविक्री व्यवसायालाही फटका

कोलकात्यातील सोनागच्छी हा देहविक्रीचा व्यवसाय चालणारा आशियातील सर्वात मोठा बाजार म्हणून ओळखला जातो.

कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा फटका वेगवेगळ्या क्षेत्रांना बसू लागला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना आता त्याचा फटका आशियातील सर्वात मोठा देहविक्री व्यवसायालाही बसला आहे. कोलकात्यातील सोनागच्छी हा देहविक्रीचा व्यवसाय चालणारा आशियातील सर्वात मोठा बाजार म्हणून ओळखला जातो. पण गेल्या दहा दिवसांपासून इथे येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमालीने घटली आहे. 

कोरोनाविरोधात लढण्यासाठी भारताकडे एकमेव जालीम उपाय - तज्ज्ञ

सोनागच्छीमध्ये सुमारे ११००० देहविक्री करणाऱ्या महिला आहेत. तर दररोज सुमारे ३०००० ग्राहक या ठिकाणी येत असतात. पण कोरोना विषाणूचे संक्रमण देशात वाढू लागल्यानंतर या ठिकाणी येणारे ग्राहक मोठ्या प्रमाणात कमी झाले. सोनागच्छीतील रस्ते रिकामे दिसू लागले आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे ग्राहकांनी या ठिकाणी जाणे टाळणेच पसंद केल्याचे दिसते.

या संदर्भात बिशाखा म्हणाल्या, कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे अनेक ग्राहक शरीरसंबंध टाळताहेत. त्यामुळे ग्राहकांनी येणेच बंद केले आहे. देहविक्री करणाऱ्या महिलांमध्येही धास्ती आहे. त्यामुळे त्यांनीही काही दिवस देहविक्री न करण्याचाच निर्णय घेतला आहे. 

पुण्यात हडपसरमध्ये अल्पवयीन मुलाला टोळक्याकडून मारहाण

महाश्वेता मुखर्जी म्हणाल्या, काही ग्राहक येताहेत. पण अनेक महिलांनी स्वतःच्या घरामध्ये थांबणेच पसंद केले आहे. ग्राहकांकडे मास्क नाहीत. त्यामुळे आजार पसरण्याचा धोका आहे. सध्या रस्त्यावर तुरळक माणसे दिसताहेत.