पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीत पुढचे पाऊल, इंग्लंडमध्ये मानवी चाचणी सुरू

कोरोना विषाणू चाचणी (संग्रहित छायाचित्र)

कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या जगातील अनेक देशांमध्ये वाढत असतानाच आता या आजारावर प्रभावी ठरेल, अशी लस शोधण्याच्या कामालाही वेग आला आहे. जर्मनी आणि इंग्लंडमध्ये या लसीची मानवावर चाचणी घेण्याचे काम याच आठवड्यात सुरू होते आहे. कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी जगात एकूण १५० ठिकाणी सध्या प्रयत्न सुरू आहेत.

देशात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा २१ हजार ३९३ वर

जर्मनीमध्ये संभाव्य लसीची मानवावर चाचणी करण्याला मंजुरी मिळाली आहे. तर इंग्लंडमध्ये हे काम याच आठवड्यात सुरू होते आहे. कोरोना प्रतिबंधक संभाव्य लसीची मानवावर घेतली जाणारी चाचणी लस निर्मितीच्या टप्प्यातील महत्त्वाचे पाऊल आहे.

इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये गुरुवारीच या लसीचा पहिला डोस स्वयंसेवकांना दिला जाणार आहे. कोरोना विषाणूच्या जनुकीय घटकांचा अभ्यास करून ही लस तयार करण्यात आली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठांमध्ये एकूण ५१० स्वयंसेवकांवर ही चाचणी केली जाणार आहे. या सर्वांचे वय १८ ते ५५ या दरम्यान आहे. या लसीच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे प्राध्यापक सरा गिलबर्ट यांनी म्हटले आहे की, मानवी चाचणी यशस्वी होण्याची ८० टक्के शक्यता आहे. 

कोरोनाशी लढा: राष्ट्रपतींच्या पत्नीने गरिबांसाठी तयार केले मास्क

जर ही चाचणी यशस्वी झाली आणि त्यानंतर लस निर्मितीसाठी आवश्यक मंजुऱ्या वेळेत मिळाल्या तर येत्या सप्टेंबरपर्यंत या लसीचे लाखो डोस निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे, असे विद्यापीठाच्या जेनर इन्स्टिट्यूटने म्हटले आहे.