अमेरिकेत कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूमुळे मृतांचा आकडा थांबायचे नाव घेत नाही. अमेरिकेत गेल्या २४ तासांत २२०० रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सोमवारच्या तुलनेत अमेरिकेत कोरोनाबाधित मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. या विषाणूमुळे जगभरातील मृतांचा आकडा २ लाख १३ हजारांपेक्षा जास्त झाला आहे.
राज्यात एका दिवसात कोरोनाचे ७२९ नवे रुग्ण, ३१ जणांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका कोरोना विषाणूमुळे सर्वात जास्त प्रभावित झालेला देश आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ५७ हजार २६६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर १० लाख ०२ हजार ४९८ नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यामधील १ लाख १२ हजार ३१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
अजित पवारांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट
दरम्यान, अमेरिकेनंतर इटली देश कोरोना विषाणूमुळे प्रभावित झाला आहे. याठिकाणी आतापर्यंत २७ हजार ३५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीमध्ये २ लाख ०१ हजार ५०५ रुग्ण आढळले आहेत. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पावणे अकरापर्यंत जगभरात २ लाख १३ हजार ८२४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ३० लाख ८३ हजार ४६७ नागिराकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ९ लाख १५ हजार ९८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.