पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लवकरच पाच मिनिटांत कोरोनाचा अहवाल देणारे टेस्ट किट, १०० रुपयांत चाचणी

कोरोना विषाणू चाचणी (संग्रहित छायाचित्र)

कोविड-१९ म्हणजेच कोरोना विषाणूविरोधात भारताने युद्ध छेडले आहे. देशात एकीकडे लॉकडाऊन सुरु आहे. डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल कर्मचारी रुग्णांवर उपचार करण्यात व्यस्त आहेत. तर देशातील आघाडीची शोध संस्था वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोदन परिषद (सीएसआयआर) यासाठी किफायतशीर तपासणी  किट आणि उपचाराचा शोध घेत आहे. याबाबत सीएसआयआरचे महासंचालक शेखर सी मांडे यांच्याशी हिंदुस्थान टाइम्सचे मदन जेडा यांनी विशेष संवाद साधला. 

गर्भवती महिलेला पतीसह उपाशीपोटी नाइलाजनं करावी लागली पायपीट

प्रश्न- कोविडचा सामना करणअयासाठी काय केले जात आहे.
उत्तर- आम्ही पाच उपाय करत आहोत. एक जिथे हा आजार पसरला आहे. तेथील धोका, प्रभाव आणि प्रकृती चांगल्या पद्धतीने समजावी यासाठी त्या भागातील स्थित प्रयोगशाळांमध्ये मॉलिक्यूलर सर्वेलंस करत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही किफायतशीर तपास किट बनवण्यावर काम करत आहोत. तिसरा उपाय हा यावर औषधे तयार करत आहोत. चौथी गोष्ट ही रुग्णालय आणि वैयक्तिक सुरक्षा उपकरणे बनवत आहोत. तसेच पाचवा उपाय म्हणजे देशातील प्रत्येक भागात वैद्यकीय उपकरणांची पूर्तता निश्चित करण्यावर काम करत आहोत. 

रोजंदारीवर काम करणाऱ्या २५ हजार लोकांसाठी सलमान खानची आर्थिक मदत

प्रश्न- आता कोविडची चाचणी करण्यासाठी पाच हजार रुपये आणि सहा तास लागतात. तुम्ही कोणत्या प्रकारचे किट तयार करत आहात ?
उत्तर-  आम्ही अशा पद्धतीची पेपर तपास किट विकसित करत आहोत, ज्यामुळे केवळ पाच ते दहा मिनिटांत चाचणी करता येईल. यासाठी खर्चही सुमारे १०० रुपये इतका येईल. आमची दिल्ली येथील प्रयोगशाळा इन्सिट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीचे शास्त्रज्ञ लवकरच हे किट तयार करतील. या किटच्या माध्यमातून कुठेही चाचणी करता येईल. 

प्रश्न- तुम्ही यावर औषधे तयार करु शकाल का ?
उत्तर- सीएसआयआरच्या तीन प्रयोगशाळा आहेत. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे, सेंट्रल ड्रग रिसर्च लॅबोरेटरी लखनऊ तसेच इंडियन इन्सिट्टयूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी हैदराबाद येथे यावर काम सुरु आहे. आम्ही खासगी क्षेत्रातील कंपनी सिप्ला आणि कॅडिला जायड्स यांच्याशीही करार केला आहे. शोध सुरु आहे. अपेक्षा आहे की, आम्ही या आजारावर प्रभावी औषधाचा शोध लावू.

प्रश्न- देशात व्हेंटिलेटरची कमतरता आहे. या दिशेने तुम्ही काम करत आहात काय ?
उत्तर- रुग्णालये आणि वैयक्तिक सुरक्षा उपकरणे तयार करण्यासाठी आम्ही बीएचईल (भेल) आदीसारख्या संस्थांबरोबर काम करत आहोत. भेलबरोबर आम्ही दहा हजार रुपयांत तयार होणारा व्हेंटिलेटर विकसित करत आहोत. यासाठी तीन मॉडेल तयार करण्यात आले आहेत. उच्च मॉडेलची किंमत सुमारे एक लाख इतकी राहिल. हे किफायतशीर व्हेंटिलेटर देशातील प्रत्येक रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचवणे सोपे जाईल. 

लॉकडाऊनमुळे मुंबईच्या प्रदूषणात ८०% टक्के घट

प्रश्न- काळानुसार कोविड-१९ स्वतः कमकुवत होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. असे शक्य आहे का ?
उत्तर- अशी शक्यता आहे. काही काळानंतर लोकांमध्ये या विषाणूविरोधात 'कठीण रोगप्रतिकार शक्ती' तयार होते, असे पाहण्यात आलेले आहे. परंतु, जोपर्यंत हे तयार होईल. तोपर्यंत याचा अनेक लोकांना संसर्ग झालेला असू शकतो. ५०-६० टक्के लोकसंख्येला या विषाणूची लागण झालेली असते आणि तेव्हा ही रोगप्रतिकार शक्ती तयार होते. 

प्रश्न- कोविड-१९ जैविक हत्यारासाठी तयार केले होते का ?
उत्तर- हा फक्त अंदाज आहे. नैसर्गिक कारणांमुळे यात बदल होतात. कधी-कधी हे बदल जास्त आणि घातक होतात. यावेळी असेच झाले आहे. यामुळे मानवाच्या शरीरात प्रतिरोधकच तयार होत नाहीत.

देशात कोरोनावर ८६ जणांची मात, १० टक्के रुग्ण झाले बरे

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: covid 19 Test kit giving corona report in five minutes soon will be tested for hundred rupees