पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ज्या गल्लीत डॉक्टरांवर दगडफेक झाली, तिथेच तिघा भावांचा मृत्यू

ज्या गल्लीत डॉक्टरांवर दगडफेक झाली, तिथेच तीन भावांचा मृत्यू

कोरोना विषाणूमुळे उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथील नवाबपुरा परिसराची विशेष चर्चा सुरु आहे. येथील लोकांनी पोलिस आणि डॉक्टरांच्या पथकावर दगडफेक केली होती. फक्त उत्तर प्रदेश नव्हे तर संपूर्ण देशभरातून यावर टीका करण्यात आली. या भागात कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून काही जणांना क्वारंटाईन करण्यासाठी हे पथक तिथे गेले होते. आता हा परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ज्या गल्लीत डॉक्टरांवर दगडफेक करण्यात आली. तेथेच तीन सख्ख्या भावांचा एकापाठोपाठ एक मृत्यू झाला. यातील दोघे कोरोना विषाणूबाधित होते. तर तिसऱ्याची कोविड-१९ ची तपासणीच झाली नव्हती. 

कोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं

मिळालेल्या माहितीनुसार, १५ दिवसांपूर्वी या कुटुंबातील मुख्य व्यक्तीचा घरीच मृत्यू झाला होता. त्यांना श्वसनाचा त्रास होता. परंतु, त्यांची कोरोना चाचणी झाली नव्हती. त्यानंतर काही दिवसांत त्यांच्या भावाची तब्येत अचानक बिघडली. त्यांची स्थिती इतकी गंभीर होती की, त्यांना त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले. ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. अहवाल आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाचा जिल्ह्यातील हा पहिला बळी होता. त्या कुटुंबात दुसऱ्यांदा शोककळा पसरली. कुटुंबालाही क्वारंटाईन करण्यात आले. त्यात मुलांचाही समावेश होता. काही दिवसानंतर तिसऱ्याचीही प्रकृती बिघडली. त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. १७ एप्रिलच्या अहवालात ते पॉझिटिव्ह आढळून आले. त्यानंतर घरातील एक-एक महिला आणि मुलांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले. चार भावांचे १२ जणांचे संपूर्ण कुटुंब कोरोना बाधित झाले आहे. 

मुंबईत लॉकडाऊन दरम्यान पोलिसांवर हल्ला, चौघांना अटक

पोलिस विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या कुटुंबामुळेच डॉक्टर आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. मोठ्या भावाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने आरोग्य तपासणी आणि त्या कुटुंबातील इतर लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी नेण्यात आले होते. तेव्हाही दगडफेक करण्यात आली होती.

म्युच्युअल फंड संकटः RBI कडून ५० हजार कोटींची तरतूद

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:covid 19 stones thrown on doctors and police in Moradabad up three brothers of the same family died due to coronavirus