पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...तर देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा आठ लाखांच्या घरात असता : लव अग्रवाल

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव आगरवाल

कोरोनाविरोधातील सामना करत असताना आपण योग्यवेळी योग्य पावले उचलली आहेत. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या साहय्याने आपण कोरोनाचे संक्रमण रोखण्यास यशस्वी झालोय, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली. ते म्हणाले की, जर आपण योग्य वेळी कठोर निर्णय घेतले नसते तर कोरोनाग्रस्तांचा आकडा  १५ एप्रिलपर्यंत  ८  लाखाहून अधिक झाला असता, असे लव अग्रवाल यांनी म्हटले आहे.  

कोविड-१९ : मुंबईतील धारावीत कोरोनाचा चौथा बळी!

ते पुढे म्हणाले की, २२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  जनता कर्फ्यूचे आवाहन केले. देशातील नागरिकांनी याला चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर २५  मार्चपासून आपण लॉकडाऊनच्या स्थितीत आहोत. परिणामी कोरोनाचे संक्रमणावर  नियंत्रण ठेवण्यात आपल्याला यश आले.  आतापर्यंत आपण १६ हजार ५१४ रुग्णांची तपासणी केली आहे. यात ७ हजार ४४७ जणांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली असून आतापर्यंत  २३९ जणांनी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील २४ तासात १०३५ नव्या केसेस समोर आल्या असून  ४० जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही लव अग्रवाल यांनी यावेळी दिली.

भीलवाडा मॉडेलचे श्रेय राहुल गांधींना देण्यावरून वाद, सरपंच भडकल्या

देशातील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारला विश्वासात घेऊन योग्य ते निर्णय घेत आहे. कोरोनासंदर्भातील आवश्यक सामूग्री राज्यांना पुरवण्यात ये आहे, अशी माहितीही लव अग्रवाल यांनी दिली आहे. आतापर्यंत  १६ हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असली तरी यातून ६४२ बरे झाले आहेत. देश परिस्थितीतून सावर आहे, असेही ते म्हणाले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Covid 19 Rise of 1 035 cases and 40 deaths reported in last 24 hours across country Health Ministry