पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना हे जसे आव्हान आहे तशी संधी सुद्धा - राहुल गांधी

राहुल गांधी

कोरोना विषाणू संक्रमण प्रतिबंधासाठी केंद्र सरकारने केलेल्या उपायांवर शंका व्यक्त करून काही प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आता सरकारला काही शिफारशी केल्या आहेत. 

वुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला - अमेरिकी माध्यम

शनिवारी केलेल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, कोविड १९ हे आपल्यापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. पण त्याचवेळी ती एक संधीसुद्धा आहे. यावेळी आपण देशातील सर्व शास्त्रज्ञांना, अभियंत्यांना, डेटातज्ज्ञांना एकत्रित आणले पाहिजे. त्यांच्या माध्यमातून या आजारावर अत्याधुनिक पद्धतीने उपाय शोधला पाहिजे. या कठीण परिस्थितीत ते आपल्या हातात आहे. 

कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत कोणताही बदल नाही - ICMR

राहुल गांधी यांनी गुरुवारी व्हिडिओ स्ट्रिमिंगच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी सरकारच्या सध्याच्या काही निर्णयांवर टीका केली होती. ते म्हणाले होते, कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वात मोठे अस्त्र म्हणजे चाचण्या करणे. सध्या आपण खूप कमी प्रमाणात चाचण्या करीत आहोत. त्याचबरोबर चाचण्या कशा करायचा, याची योग्य रणनितीही आपण आखलेली नाही. आपण लवकरात लवकर रॅपिड टेस्टिंगला सुरुवात केली पाहिजे. जर आपण चाचण्यांची संख्या वाढवली नाही तर आपल्याला पुन्हा एकदा लॉकडाऊनचा कालावधी वाढवायला लागेल, असे त्यांनी म्हटले होते.