पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'तबलिगी समाजातील २५,५०० लोक विलगीकरण कक्षात'

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहाय्यक सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव

दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील तबलिगी समाजाच्या मरकज मुख्यालयातील कार्यक्रमामुळे देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात मोठी वाढ झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर  या कार्यक्रमात सहभागी झालेल्या तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्याची मोठ आव्हान सरकार आणि प्रशासनासमोर उभे राहल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता स्थानिक तबलिगी समाजातील २५ हजार ५०० सदस्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. 

मशिदीत लपलेल्या ९ पाकिस्तानी नागरिकांना अटक

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव पुण्या सलिला श्रीवास्तव यांनी आरोग्यमंत्रालय आणि गृहमंत्रालयाच्या संयुक्त पत्रकारपरिषदेवेळी यासंदर्भातील माहिती दिली.  ज्या लोकांना निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे त्यामध्ये तबलिग समाजाचे सदस्य आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा समावेश आहे. हरियाणातील वेगवेगळ्या पाच गावात शोधमोहिमेच्या अंतर्गत या सर्वांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.

देशातील ४०६७ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ७६ टक्के पुरुष

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा चार हजारहून अधिक झाला असून दिल्लीतील तबलिगी समाजाच्या कार्यक्रमानंतर देशातील आकडा हा दणक्यात वाढला होता. यात जवळपास १ हजार ४४५ तबलिगी समाजातील लोकांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती. नियमांचे उल्लंघन करुन सामूहिक कार्यक्रम केल्याच्या पार्श्वभूमीवर १ हजार ७०० तबलिगी सदस्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.  या कार्यक्रमात दोन हजारहून अधिक परदेशी लोकांचा सहभाग होता.