पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना विषाणू कृत्रिमपणे तयार केला नसून नैसर्गिकच, शास्त्रज्ञांचे संशोधन

इटलीतील एका दाम्पत्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. (संग्रहित छायाचित्र)

कोरोना विषाणू प्रयोगशाळेत तयार करण्यात आला आहे आणि जैविक युद्धासाठी तो वापरण्यात येणार होता. पण प्रयोगशाळेतूनच तो चुकून बाहेर पडल्याची माहिती गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगात चर्चेत होती. पण अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी हा तर्क फेटाळून लावला आहे. कोरोना विषाणू संदर्भातील संशोधनानंतर त्यांनी हा विषाणू प्रयोगशाळेत तयार केलेला नसून तो नैसर्गिकपण तयार झाला असल्याचे म्हटले आहे.

दिल्लीत ऑस्ट्रेलियावरून परतलेल्या कोरोना संशयिताची आत्महत्या

अमेरिकेतील स्क्रिप्स रिसर्च इन्सिट्यूटमधील इम्यूनॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी विभागाच्या शास्त्रज्ञांनी या संदर्भात संशोधन केले. त्यानंतर त्यांनी हा विषाणू कृत्रिमपणे तयार केलेला किंवा मुद्दामहून लीक करण्यात आल्यासारखे दिसत नसल्याचे म्हटले आहे. या संशोधनाचे निष्कर्ष १७ मार्चला नेचर मेडिसीन जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. या विषाणूमुळे आतापर्यंत ७५०० हून अधिक नागरिकांचा जगभरात मृत्यू झाला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून लोकांच्या अनौपचारिक चर्चेमध्ये, ब्लॉग्सवर, सोशल मीडियातील हँडल्सवर याची चर्चा सुरू होती. पण अमेरिकेतील शास्त्रज्ञांच्या संशोधनानंतर हा विषाणू नैसर्गिकपणेच मानवामध्ये संक्रमित झाला असल्याचे दिसून आले आहे.

कोरोनामुळे इटलीत एकाची दिवशी 475 जणांचा मृत्यू

स्क्रिप्स रिसर्च इन्सिट्यूटमधील इम्यूनॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी विभागात सहयोगी प्राध्यापक असलेले क्रिश्चियन एँडरसन यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा आणि जिनोम सीक्वेन्सचा अभ्यास केल्यानंतर हे दिसून आले आहे की हा विषाणू नैसर्गिक पद्धतीनेच तयार झाला आहे. तो प्रयोगशाळेत कृत्रिमपणे तयार करण्यात आलेला नाही.