पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या भागांत एँटिबॉडी टेस्ट घ्या, ICMR चे निर्देश

कोरोना तपासणी

ज्या भागामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळत आहेत. यालाच हॉटस्पॉट असेही म्हटले जाते. तिथे एँटिबॉडी टेस्ट (रक्ताची चाचणी) करण्याची सूचना इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केली आहे. या निर्णयामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण वेगाने ओळखणे शक्य होईल.  

लॉकडाऊन कसा संपवायचा, पंतप्रधानांनी मागविल्या शिफारशी

सध्या कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी पीसीआर पद्धती वापरली जाते. यामध्ये संशयित रुग्णाच्या घशातील स्वॉब घेतले जातात. या चाचणीचे निकाल येण्यासाठी साधारणपणे पाच ते सहा तासांचा कालावधी लागतो. सध्या केवळ ताप, खोकला, सर्दी अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची आणि कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची पीसीआर चाचणी केली जात आहे.

एँटिबॉडी चाचणीमुळे ज्या रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, त्यांना शोधणे शक्य होईल. विशेषतः ज्या रुग्णांमध्ये अजिबात लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत, त्यांना शोधणे यामुळे शक्य होईल. यामुळे कोणत्या नागरिकांनी कोरोनाचा प्रभावीपणे मुकाबला केला आहे, हे सुद्धा स्पष्ट होईल. ज्याला कोरोना ब्लॉकर असे म्हटले जाते.  

क्वारंटाइनमध्येही लोक ऐकायला तयार नाहीत, हॉस्पिटलमध्ये नमाज पठण सुरु

एँटिबॉडी तपासणीचा निकाल येण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागतो. जिथे रुग्ण अधिक प्रमाणात सापडत आहेत. तिथे रॅपिड एंटिबॉडी टेस्ट केली जावी. जे रुग्ण या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळतील. त्यांची पीसीआर चाचणी घेतली जावी. जे रुग्ण निगेटिव्ह आढळतील. त्यांना घरातच थांबण्याच्या सूचना दिल्या जाव्यात, असे आयसीएमआरच्या निवेदनात म्हटले आहे.

एँटिबॉडी टेस्टचा अर्थ काय?
एँटिबॉडी टेस्टमध्ये संशयित रुग्णाच्या रक्ताचे काही थेंब घेतले जातात. जर ही टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्याचा अर्थ संबंधित रुग्णामध्ये कोरोना विषाणूच्या एँटिबॉडीज आहेत. याचाच अर्थ त्याला आधी हा आजार झाला होता आणि तो आजारातून बरा झाला आहे. कोणत्याही बाह्य विषाणूपासून शरीराचे रक्षण केल्यानंतर एँटिबॉडीज तयार होत असतात.