पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाची लक्षणे असल्यास ही औषधे अजिबात घेऊ नयेत

कोरोनाचा संसर्ग असेल तर एँटी इन्फ्लेमेटरी औषधे अजिबात घेऊ नयेत. (संग्रहित छायाचित्र)

कोरोना विषाणूची लक्षणे असलेल्या रुग्णांनी स्वतःहून कोणतीही औषधे घेऊ नयेत. विशेषतः आयबूप्रोफेन घेणे टाळलेच पाहिजे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. एँटी इन्फ्लेमेटरी औषधांमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते, असे फ्रान्समधील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने हे निर्देश दिले आहेत. 

भीमा-कोरेगाव प्रकरण : शरद पवारांना साक्ष नोंदविण्यासाठी बोलावले

द लॅन्सेटमध्ये या संदर्भात एक संशोधन प्रसिद्ध झाले आहे. त्यामधील निष्कर्षांच्या आधारावर फ्रान्सचे आरोग्य मंत्री ऑलिव्हर वेरान यांनी फ्रान्समध्ये कोणत्याही कोरोना संशयित व्यक्तीने आयबूप्रोफेन किंवा स्वतःहून कोणतेही औषध घेऊ नये, असे म्हटले आहे. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने या संदर्भात निर्देश जारी केले. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणे असताना एँटी इन्फ्लेमेटरी औषधे घेतल्याने परिस्थिती आणखी चिघळू शकते. या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेकडून आणखी संशोधन केले जात आहे, असे या संघटनेच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. 

कोरोनाशी असाही लढा, घरमालकाने घरभाडे केले माफ!

या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेकडून पुढील निर्देश जारी केले जात नाहीत. तोपर्यंत रुग्णांनी केवळ पॅरासिटॉमॉल घ्यायला हरकत नाही. पण त्याचवेळी तातडीने डॉक्टरांना दाखवणे आवश्यक आहे, असेही जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ते ख्रिश्चियन लिंडमिअर यांनी म्हटले आहे.