पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाचा पहिला बळी, ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये कोरोना विषाणूग्रस्त नागरिकाचा मृत्यू झाल्याचे पहिले प्रकरण समोर आले आहे. कोरोना विषाणूमुळे ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तीच्या संपर्कात आलेले इतर चार जणही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. देशभरात आतापर्यंत कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. 

'एएनआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव रोहित कन्सल यांनी सांगितले की, श्रीनगरमध्ये एक ६५ वर्षीय व्यक्तीचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने आणखी चार लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

लॉकडाऊनचा परिणाम, देशातील १०२ शहरांतील हवेची गुणवत्ता सुधारली

दरम्यान, कोरोना विषाणू भारतात हळूहळू आक्राळ-विक्राळ रुप धारण करत आहे. देशात वेगाने रुग्ण वाढत आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत देशात यामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. राजधानी दिल्लीत या प्रकरणातील मृत्यूचे दुसरे प्रकरण समोर आले. तामिळनाडूतही यामुळे एकाचा मृत्यू झाला. 

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गुरुवारी सकाळी पहिल्या टप्प्यात मुंबई आणि ठाण्यातून दोन नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने राज्याचा आकडा १२४ वर गेला आहे.

चीनमध्ये परिस्थिती पूर्वपदावर, कार उत्पादक कारखाने सुरू

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Covid 19 first death in Jammu and kashmir A 65 year old man from Hyderpora Srinagar passes away due to Coronavirus