कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना बरे करण्यासाठी या आजारातून ठणठणीत बरे झालेल्या रुग्णांचा प्लाज्मा (रक्तातील घटक) अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. चीन आणि इतर काही देशांमध्ये या संदर्भात काम सुरू झाले आहे. मेदांता मेडिसिटीचे अध्यक्ष डॉ. नरेश त्रेहन म्हणाले की, येत्या काही दिवसांत गरज पडल्यास भारतात याचा वापर केला जाऊ शकतो.
कोरोनामुळे संपूर्ण जगात मंदीची शक्यता, भारतासाठी मात्र खूशखबर
कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर त्यातून ठणठणीत बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरातील प्लाज्मा कोरोनामुळे गंभीर असलेल्या रुग्णांमध्ये वापरून त्यातून त्यांना बरे करण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. जे रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. त्यांच्या शरीरातील प्लाज्मामध्ये या विषाणूशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या एँटिबॉडिज तयार असतात. त्यामुळे त्याचा उपयोग दुसऱ्या रुग्णांना होऊ शकतो, असे दिसून आले आहे. मेदांतामधील वरिष्ठ डॉक्टर सुशिला कटारिया यांनी असे करणे शक्य असल्याचे म्हटले आहे. यासोबतच बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरातील इंटरफेरॉनही कोरोनाशी लढण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, असेही डॉक्टरांनी सांगितले.
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये IPL घेण्यासाठी बीसीसीआयकडून चाचपणी सुरू
भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले तरच याचा उपयोग केला जाऊ शकतो, असेही डॉक्टरांनी म्हटले आहे. यासाठी एक पद्धती सध्या विकसित केली जात आहे. ज्यामध्ये बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरातील प्लाज्मा त्यांच्या संमतीने घेणे आणि त्याचा वापर करणे याचा समावेश असेल. ज्या रुग्णामध्ये याचा वापर केला जाईल. त्याचीही यासाठी आधी संमती घेतली जाईल, असे डॉक्टर म्हणाले. यासंदर्भात प्रोटोकॉल तयार झाल्यानंतर तो इतर डॉक्टरांशी दिला जाईल.