पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चीनने पाठवलेली वैद्यकीय साधने निकृष्ट, युरोपिय देशांची तक्रार

विशेषतः युरोपमधील देशांनी चीनमधून आलेल्या साधनांच्या दर्जावर कडाडून टीका केली.

कोरोना विषाणूच्या उद्रेकानंतर त्याच्याशी लढण्यात व्यग्र असलेल्या देशांनी आता चीनमधून पाठविण्यात आलेली वैद्यकीय उपकरणे आणि साधने निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार केली आहे. विशेषतः युरोपमधील देशांनी चीनमधून आलेल्या साधनांच्या दर्जावर कडाडून टीका केली.

कोरोना इम्पॅक्ट : सरकारी कर्मचाऱ्यांच्या, आमदारांच्या वेतनात मोठी कपात

गेल्या रविवारी नेदरलँड्सने चीनमधून पाठविण्यात आलेले हजारो मास्क परत पाठवले. या मास्कचा दर्जा एकदम निकृष्ट असल्याचे नेदरलँड्सचे म्हणणे आहे. त्याचवेळी स्पेनने चीनमधून आलेले टेस्टिंग किट्सही निकृष्ट दर्जाचे असल्याचे म्हटले आहे. चीनमधील उत्पादकांनी हे टेस्टिंग किट्स स्पेनला निर्यात केले होते. 

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, अनेक देशांनी आमच्याकडून निर्यात केल्या गेलेल्या वैदयकीय उपकरणांच्या आणि साधनांच्या दर्जावर शंका उपस्थित केली आहे. या देशांनी व्यक्त केलेल्या शंका आम्ही गांभीर्याने घेत आहोत. नक्की गडबड कुठे झाली आहे हे आम्ही बघतो आहोत.

लॉकडाऊनदरम्यान विजय मल्ल्याचा पुन्हा कर्ज फेडण्याचा प्रस्ताव

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुईंग म्हणाले, जगातील वेगवेगळ्या देशांकडून विविध वैद्यकीय उपकरणांची आणि साधनांची मागणी रोजच्या रोज येते आहे. आम्हाला या सर्व देशांना मदत करायची आहे. यामुळे साधने आणि उपकरणांच्या निर्मितीमध्ये काही त्रुटी राहात असतील तर आम्ही संबंधित कंपन्यांशी तेथील अधिकाऱ्यांशी बोलू.