पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गरिबांच्या खात्यात पैसे जमा करा, पी. चिदंबरम यांची PM मोदींकडे मागणी

पी. चिदंबरम

कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवारी) राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. या बैठकीत देशव्यापी लॉकडाऊनसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एक खास मागणी केलीय. देशातील ज्या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे त्या राज्यातील गरिब कुटुंबियांच्या खात्यात मदत निधी जमा करण्याची तरतूद करावी, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठकीत ही मागणी उचलून धरावी, अशी सूचनाही त्यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना केली आहे. 

पंतप्रधानांची आज सर्व मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक
 
पी चिदंबरम यांनी यासंदर्भात ट्विटवरुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. गरिब कुटुंबातील अनेकजणांचा रोजगार गेला आहे. त्यांच्याजवळ आता पैसा नाही. सरकारकडून मोफत जेवणासाठी ही मंडळी रांगेत उभा राहताना दिसते. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटात अडकलेल्या गरिब कुटुंबियांच्या मदतीसाठी ६५ हजार कोटींची तरतूद अपेक्षित आहे, असा उल्लेख चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय.

चीनमध्ये पुन्हा कोरोनाबाधित ४६ रुग्ण आढळले, तिघांचा मृत्यू

राज्यातील गरिब जनतेला तुम्ही उपाशी पाहू शकता का? असा प्रश्न उपस्थितीत करत गरिब कुटुंबियांना मदत निधी मिळावा, याचा प्रस्ताव एकमताने पंतप्रधानांसमोर ठेवा, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. सध्याच्या घडीला कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येताना दिसत नाही. परिणामी देशातील काही भागातील लॉकडाऊनची स्थिती १४ एप्रिलनंतरही कायम राहू शकते. या निर्णयामुळे आर्थिक परिस्थिती आणखी गंभीर झाल्याचे पाहायला मिळू शकते. कोरोनाशी लढा आणि त्यामुळे निर्माण झालेली आर्थिक संकट याचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Covid 19 Chidambaram urges chief ministers to make a unanimous demand ask Centre to remonetise the poor