पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CoronaVirus: इराणमध्ये अडकलेले २३४ भारतीय मायदेशी परतले

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तोंडावर मास्क लावून रेल्वेची माहिती घेताना परदेशी पर्यटक

कोरोना विषाणूने प्रभावित इराणमध्ये अडकलेल्या २३४ भारतीयांना मायदेशात परत आणण्यात आले आहे. या विमानात १३१ विद्यार्थी आणि १०३ भाविक होते. इराणमधून भारतात आलेली ही तिसरी बॅच आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ५८ नागरिक आहेत. गेल्या २३ दिवसांपासून ते तेहरानमध्ये अडकले होते.  यापूर्वी शुक्रवारी ४४ भारतीयांना इराणमधून सुखरुप देशात आणण्यात आले होते. या सर्व भारतीय प्रवाशांना आता जैसलमर केंद्रात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. 

राज्यपालांचा कमलनाथ सरकारला आदेश, उद्याच बहुमत चाचणी

इराणमध्ये अडकलेले २३४ देशवासिय भारतात परतल्याचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितले. त्यांनी राजदूत धामू आणि इराण सरकारचे आभार मानले. कोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रसार झालेल्या देशांमध्ये इराणचा समावेश होतो. 

इराणच्या सरकारी वाहिनीने शनिवारी म्हटले की, कोरोना विषाणूग्रस्त आणखी ९७ जणांना मृत्यू झाला आहे. देशात मृतांचा आकडा ६११ झाला आहे. देशात १२,७२९ लोक या आजाराने ग्रस्त आहेत. पश्चिम आशियामध्ये इराण कोरोना विषाणूने सर्वाधिक प्रभावित झालेला देश आहे. अनेक अधिकारीही या विषाणूने ग्रस्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, राज्यात सर्वाधिक ३१ रुग्ण

यापूर्वी सौदी अरेबियाने कोरोना विषाणूमुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर दोन आठवड्यांची बंदी घातली. सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंबंधी टि्वट केले. आखाती देशही जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूच्या तडाख्यात बसला आहे. जगभरातील दीड लाखांहून अधिक लोक कोरोना विषाणूने ग्रस्त झाले आहेत.