पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरण : दोषींच्या फाशीला पुढील आदेशापर्यंत पुन्हा स्थगिती

निर्भया प्रकरणातील दोषी

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींच्या फाशीच्या अंमलबजावणीला दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली. या प्रकरणातील चारही दोषींना मंगळवारी, ३ मार्च २०२० रोजी सकाळी सहा वाजता तिहार तुरुंगात फाशी देण्यात येणार होती. पण न्यायालयाच्या आदेशामुळे चारही दोषींची फाशी तूर्त टळली आहे.

'चीन, इराण, सिंगापूरचा अनावश्यक प्रवास टाळा'

या प्रकरणातील एक दोषी पवन गुप्ता याची दया याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. त्यामुळे या प्रकरणी त्याच्यासह इतर तीन दोषींना मंगळवारी फाशी देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या सुनावणीवेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी पवन गुप्ता यांच्या वकिलांना खडे बोल सुनावले. न्यायालय म्हणाले, तुम्ही आगीशी खेळता आहात. तुम्हाला सतर्क राहिले पाहिजे. कुणाकडून एक चुकीचे पाऊल उचलले गेले तर त्याचे परिणाम काय होतील, तुम्हाला माहितीये. विनय शर्मा, मुकेशकुमार सिंह, पवन गुप्ता आणि अक्षय ठाकूर अशी दोषींची नावे आहेत.

दिल्लीपर्यंत पोहोचला कोरोना विषाणू, देशात २ रुग्ण पॉझिटिव्ह

चारही दोषींविरोधात दिल्लीतील न्यायालयाने ७ जानेवारीला पहिल्यांदा डेथ वॉरंट जारी केले होते. त्यांना २२ जानेवारीला फाशी देण्याचे निश्चित करण्यात आले होते. पण नंतर फाशीची अंमलबजावणी १ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली. पण त्यावेळीही फाशीची अंमलबजावणी ३१ जानेवारीला आणखी पुढे ढकलण्यात आली. आता या चारही दोषींना ३ मार्चला फाशी देण्याचे निश्चित करण्यात आले होते. चार दोषींपैकी एक असलेल्या पवन गुप्ता याची निर्णय सुधार याचिका सोमवारीच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.