पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसच्या 'संकटमोचका'वरील संकट अजूनही कायम

डीके शिवकुमार

मनी लाँड्रिगप्रकरणी कारागृहात असलेले कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डी के शिवकुमार यांच्या जामीन याचिकेवरील निकाल विशेष न्यायालयाने राखीव ठेवला आहे. यापूर्वी फिर्यादी आणि बचाव पक्षाने याचिकेच्या बाजू आणि विरोधात आपले म्हणणे मांडले होते. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आपला निर्णय सुरक्षित ठेवला आहे. न्यायालय आता २५ सप्टेंबरला आपला निर्णय देईल.

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्यानंतर डी के शिवकुमार यांच्या भोवती ईडीने फास आवळला आहे. शिवकुमार या प्रकरणी चौकशीसाठी तिसऱ्यांदा सोमवारी ईडीसमोर उपस्थित राहिले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. कर्नाटक काँग्रेसचे 'संकटमोचक' समजले जाणाऱ्या शिवकुमार यांनी जामिनासाठी याचिका दाखल केली आहे.

GST परिषदेकडून हॉटेल उद्योग, निर्यात क्षेत्रासाठी खूशखबर