पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लग्नात जोडप्याला मिळालं 'सर्वात महागडं गिफ्ट'

(Twitter/@sunilkapoor8)

कांद्याचे भाव सध्या गगनाला भीडले आहेत. कांद्याच्या चढ्या किमतीनं सामान्यांना पुन्हा एकदा रडवलं आहे. अशा महागाईत तामिळनाडूतल्या एका जोडप्याला सध्याची महागडी भेट मिळाली आहे, अन् या भेटीची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

VIDEO : मैदानावर साप आल्याने रणजी करंडक स्पर्धेतील सामन्याला उशीर

तामिळनाडूमधील एका जोडप्याला त्यांच्या लग्नाच्यादिवशी कांद्याचा गुच्छ मित्रांनी भेट म्हणून दिला आहे. अडीच किलो कांद्यापासून हा गुच्छ तयार करण्यात आला आहे. सध्या अनेक ठिकाणी  कांदे १०० ते १२० रुपये किलो दरानं विकले जात आहेत. तर तामिळनाडूत कांदाचा दर १६० रुपये किलोंच्या आसपास आहे. अशा वेळी नवविवाहित जोडप्याला भेट देण्यासारखी उपयुक्त गोष्ट ती कोणती असं म्हणत चार मित्रांनी ही आगळी वेगळी भेट दिली आहे. 

अमित शहा म्हणाले, ...म्हणून नागरिकत्व सुधारणा विधेयक आवश्यक

'इथे कांदे १९५ रुपये दरानं विकले जात आहे. यामुळे सर्वसामान्य माणसांचं घराचं बजेट पूर्णपणे कोलमडलं आहे. आम्ही या जोडप्याला भेट देण्यासाठी ५०० रुपयांचे अडीच किलो कांदे खरेदी केले आहेत', अशी माहिती या जोडप्याच्या एका मित्रानं द हिंदूशी बोलताना दिली.