पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देश सध्या कठीण परिस्थितीतून जातोय - सरन्यायाधीश

सरन्यायाधीश शरद बोबडे

देश सध्या कठीण परिस्थितीतून जातो आहे आणि सर्वोच्च न्यायालयातील याचिकांमुळे परिस्थिती आणखी बिघडायला नको, असे निरीक्षण सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी गुरुवारी नोंदविले. केंद्र सरकारने केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात अनेकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या कायद्याच्या विरोधात आणि बाजून याचिका दाखल झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीशांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.

मुंबई पोलिसांना मोठे यश, गँगस्टर एजाज लकडावालाला बेड्या

सरन्यायाधीश म्हणाले, देश सध्या कठीण परिस्थितीतून जातो आहे. अनेक प्रश्न समोर आहेत. या स्थितीत देशात शांतता प्रस्थापित करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. पण न्यायालयात दाखल याचिकांमधून हे साध्य होणार नाही. संसदेने मंजूर झाल्यानंतर एखादा कायदा कायदेशीर ठरवला जावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याचे आम्ही कधी ऐकले नाही, असेही त्यांनी सांगितले.

काही विचारवंत सापासारखे विषारी - उमा भारती

नागरिकत्व कायद्यात सुधारणा करणारे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केले आहे. विधेयकानंतर कायद्यात बदल करण्यात आल्यावर या विरोधात देशात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झाले. आंदोलनाचे स्वरुप काही ठिकाणी हिंसकही झाले होते. काही राज्यांनी या कायद्याची अंमलबजावणी आपल्या राज्यात करणार नसल्याचे सांगितले. यामध्ये केरळ आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे. देशातील विद्यार्थीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे तेथील परिस्थिती बिघडली आहे.