पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारताला पाठिंबा देणाऱ्या देशावर क्षेपणास्त्र डागू, पाक मंत्री बरळले

भारताला पाठिंबा देणाऱ्या देशावर क्षेपणास्त्र डागू, पाक मंत्री बरळले

पाकिस्तानचे एक मंत्री आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. अली अमीन गंडापूर असे या मंत्र्याचे नाव असून काश्मीर प्रकरणी जो देश भारताला पाठिंबा देईल, त्याच्यावर क्षेपणास्त्र डागण्यात येईल असा दमच त्यांनी दिला आहे. काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान प्रकरणांचे मंत्री अली अमन यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कुडानकुलम प्रकल्पावर सायबर हल्ला अशक्य, प्रकल्प अधिकाऱ्यांची माहिती

व्हिडिओत अली अमीन म्हणत आहेत की, जर काश्मीरवरुन भारताबरोबर तणाव वाढला तर पाकिस्तानला नाईलाजाने युद्ध करावे लागेल. अशावेळी जो देश भारताला पाठिंबा देईल. त्यांना आम्ही शत्रू मानू आणि त्या देशांवर क्षेपणास्त्र डागण्यात येईल.

पाकिस्तानच्या एका पत्रकाराने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानचे मंत्र वादग्रस्त आणि चिथावणीखोर वक्तव्ये करत आहेत.

काँग्रेसकडून 'या' स्वातंत्र्य सैनिकांना भारतरत्न देण्याची मागणी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असतानाच अली अमीन यांचे वक्तव्य समोर आले ओहे. पाकिस्तानचा प्रमुख सहयोगी मानला जाणारा सौदी अरेबिया दहशतवाद मुक्त करण्यासाठी भारताच्या बाजूने उभा आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Countries backing India will be hit by missile Pakistan minister rakes up nuclear war threat