पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राबडी देवीनं पाठवलेल्या सामानात स्फोटकंही असतील ऐश्वर्या रायच्या वडिलांचा आरोप

हुंडा परत घेण्यास ऐश्वर्याच्या वडिलांचा नकार

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची पत्नी राबडी देवीनं माघारी पाठवलेले हुंड्याचे सामान परत घेण्यास सून ऐश्वर्या रायच्या वडिलांनी नकार दर्शवला आहे. या सामानात स्फोटकं असतील किंवा दारूच्या बाटल्याही असतील असं म्हणत चंद्रिका राय यांनी हे सामान नाकारलं आहे.

खातेवाटपावरून काँग्रेस नेत्यांची नाराजी उघड, मुख्यमंत्र्यांना साकडे

लालू प्रसाद यादव यांच्या घरी सुरु असलेले गृहकलह गेल्याकाही दिवसांपासून समोर आले आहेत.  ऐश्वर्या ही तेजप्रतापची पत्नी आहे. विवाहनंतर अवघ्या काही दिवसांत तेजप्रताप आणि ऐर्श्वयामधले गृहकलह समोर आले आहेत.  काही दिवसांपूर्वीच सून ऐश्वर्या रायनं राबडी देवीविरोधात मारहाणीची तक्रार केली तर त्यानंतर लगेच राबडीदेवीनंही ऐर्श्वया रायपासून जीवाला धोका असल्याची तक्रार केली. हे प्रकरण शांत होत नाही तोच ऐश्वर्याच्या आईनं हुंड्यात दिलेल्या वस्तू परत करण्याची मागणी केली. यासंदर्भात लालूप्रसाद यांच्याघरी कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आली.
ही नोटीस प्राप्त झाल्यानंतर गुरूवारी रात्री दोन गाड्या भरून हुंड्यात दिलेलं सामान राबडीदेवींनी माघारी पाठवून दिलं. मात्र संपूर्ण रात्रभर या दोन्ही गाड्या ऐश्वर्याच्या घराबाहेर उभ्या होत्या. त्यातील सामान घेण्यास चंद्रिका राय यांनी नकार दिला आहे. 

एनआरसी आणि एनपीआर म्हणजे गरिबांवरील टॅक्स, राहुल गांधींचा आरोप

या सामानात स्फोटकं असतील किंवा दारूच्या बाटल्याही असतील अशी भीती त्यांनी वर्तवली आहे. कायद्याप्रमाणे या वस्तू पाठवताना तिथे पोलिस अधिकारी उपस्थित असणं आवश्यक आहे मात्र तिथे  कोणीही नव्हतं, या सामानाविषयी आम्हाला  खात्री नाही असं म्हणत ते स्वीकारण्यास  चंद्रिका राय यांनी नकार दिला आहे.