पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाची जागतिक साथ, WHO ची घोषणा

कोरोना

कोरोना विषाणू जगातील १०० देशांमध्ये फोफावला आहे. महिन्याभरापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना विषाणूमुळे आरोग्य आणीबाणी जाहीर केली होती. चीनच्या वुहानपासून फैलावत गेलेला हा विषाणू आता राज्याच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे. चीनव्यतिरिक्त कोरिया, इटली, इराणमध्ये  कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) करोना विषाणूची जागतिक साथ पसरत असल्याचं घोषित केलं आहे. 

म.रे.चे २०० प्रशिक्षित कोरोनाची लक्षणं ओळखून प्रवाशांना पुरवणार मदत

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या वाढून ६७ वर पोहोचली आहे. राज्यात पुणे, मुंबई आणि नागपूरमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले  असून त्यांची संख्या ११ वर पोहोचली आहे. या व्यतिरिक्त दिल्ली, केरळ, राजस्थान, उत्तरप्रदेशमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरात १ लाख १८ हजारांहून अधिक लोकांना या विषाणूची बाधा झाली आहे तर ४ लाख २०० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहे. चीनमधील वुहान हे प्रांत कोरोनाचं  केंद्रबिंदू आहे. डिसेंबरपासून कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. 

'CAA समर्थनार्थ रॅलीमुळे दिल्ली हिंसाचार घडला असे म्हणता येणार नाही'

 बुधवारी रात्री जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना विषाणूची जगभरात साथ पसरत असल्याचं जाहीर केलं आहे. संपूर्ण जगाने एकजुटीने या जीवघेण्या आजाराशी लढावं असं आवाहन केलं आहे. कोरोनाच्या देशातील वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने अनेक देशातील नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. १५ एप्रिलपर्यंत परदेशी पर्यटकांचा व्हिसा रद्द करण्यात आला असून भारताचे दरवाजे त्यांच्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहेत. १३ मार्चला मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांमुळे देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, याची खबरदारी म्हणून केंद्र सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. डिप्लोमेटिक, कार्यालयीन व्हिसा, आंतरराष्ट्रीय संघटना  याव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. 

लोकांना घाबरवत का आहात, राज ठाकरेंचा सवाल

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:coronavirus World Health Organization made the assessment that COVID19 can be characterized as a pandemic