पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनावरील लस, ऑस्ट्रेलियातील भारतीय शास्त्रज्ञाचे कौतुकास्पद काम

कोरोना विषाणू

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगभरात सध्या काहीसे भितीचे वातावरण आहे. चीनमध्ये या विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. त्यामुळे शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत. हजारो लोकांना या विषाणूची बाधा झाली आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर एक दिलासा देणारी बातमी आहे. ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ सायंटिफिक एँड इंड्रस्ट्रियल रिसर्च ऑर्गेनायझेशनच्या काही शास्त्रज्ञांनी या विषाणूवर लस निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे काम केले आहे. यासंदर्भात प्राथमिक चाचण्या तिथे यशस्वी झाल्या आहेत. विशेष म्हणजे या शास्त्रज्ञांच्या चमूचे नेतृत्त्व एका अनिवासी भारतीयाने केले. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरुच; मृतांचा आकडा ६३६ वर

गेल्याच आठवड्यात या संदर्भात ऑस्ट्रेलियातील डोहर्टी इन्स्टिट्यूटमध्ये शास्त्रज्ञांनी केलेल्या चाचणीमध्ये या लसीच्या वापरातून मानवी नमुन्यातून हा विषाणू विलग करण्यात यश मिळाले होते. 

ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ सायंटिफिक एँड इंड्रस्ट्रियल रिसर्च ऑर्गेनायझेशनमधील एक प्राध्यापक एस एस वासन म्हणाले, डोहर्टी इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे. त्यांनी तातडीने संशोधन करून या स्वरुपाची लस निर्माण करण्याचा दिशेन पाऊल टाकले. या लसीची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यापूर्वी आवश्यक असणाऱ्या चाचण्या (प्री क्लिनिकल) आता वेगाने केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

'कोरोना'च्या विळख्यातील पाक विद्यार्थ्यांची मदत करु, पण...'

ऑस्ट्रेलियन ऍनिमल हेल्थ लॅबोरेटरीतील माझे सहकारीही या संदर्भात निरीक्षणे, निदान आणि प्रतिसाद नोंदविण्याचे काम करीत असल्याचेही वासन यांनी सांगितले.