पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमेरिकेत कोरोनामुळे एका दिवसात १,४८० नागरिकांचा मृत्यू

कोरोना विषाणू

जगभरात जीवघेण्या कोरोना विषाणूने थैमान घातले असून दिवसेंदिवस मृतांच्या आकड्यात वाढ होत चालली आहे. जगातील सर्वात शक्तीशाली देश असलेल्या अमेरिकेमध्ये कोरोना विषाणूचा सर्वात जास्त प्रादुर्भाव झाला आहे. शुक्रवारी अमेरिकेत या विषाणूने एका दिवसात १४८० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर एका दिवसापूर्वी अमेरिकेत कोरोनाने ११६९ नागरिकांचा बळी घेतला होता. 

परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणणे शक्य नाही: केंद्र सरकार

अमेरिकेमध्ये तब्बल पावणे तीन लाख लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. हा आकडा अन्य देशांच्या तुलनेत सर्वात मोठा आहे. अमेरिकेत आतापर्यंत ७,४०६ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चीनच्या वुहान प्रांतातातून पसरण्यास सुरुवात झालेल्या कोरोना विषाणूचे जगभरातील ११० पेक्षा अधिक देशांमध्ये रुग्ण आढळले आहेत. 

'डॉक्टर अन् त्यांच्या स्टाफवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा'

जर्मनीमध्ये शुक्रवारपर्यंत ८९,४५१ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर चीनमध्ये आतापर्यंत ८१,६२० नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. इटली आणि स्पेनमध्ये या विषाणूने सर्वात जास्त थैमान घातले असून याठिकाणी मृतांचा आकडा सर्वात जास्त आहे. जगभरात कोरोनाचे १० लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. तर आतापर्यंत ५० हजारांपेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे.

कोविड-१९ : इस्त्रायल पंतप्रधानांची PM मोदींकडे सहकार्याची विनंती