पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गुजरातमध्ये कोरोनाचा दुसरा बळी!

देशातील कोरोनाच्या मृतांचा आकड्यात आणखी भर पडली आहे.

देशातील कोरोना विषाणूचे संकट थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयात ८५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गुजरातमधील कोरोनाचा हा दुसरा बळी आहे. यापूर्वी सूरतमध्ये एका ६९ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.  

नाकाबंदी दरम्यान दुचाकीस्वाराने पोलिसाच्या अंगावर घातली गाडी

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ही महिला परदेशातून परतली होती. वेगवेगळ्या आजाराने त्रस्त असल्यामुळे २२ मार्च रोजी महिलेला अहमदाबादेतील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेने रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. तिचा मृत्यू हा कोरोनामुळेच झाल्याची पुष्टी झाली असून देशातील मृत्यांचा आकडा १३ वर पोहोचला आहे. आतापर्यंत ६०० हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली असून हा आकडा वाढतच आहे. 

कोरोनाविरोधात लढ्यासाठी राज्यात २२,११८ खोल्या सज्ज : अशोक चव्हाण

कोणताही उपचार नसलेल्या जीवघेण्या कोरोना विषाणूला नियंत्रित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. देशभरातील नागरिकांमध्ये कोरोनाबद्दल भीती निर्माण झाली असून चिंता वाढत आहे. घाबरुन न जाता घरात बसून आपण यावर मात करु शकतो, असा विश्वास मोदींनी आपल्या भाषणातून देशवासियांना दिला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Coronavirus Updates Second Covid 19 death in Gujarat confirmed cases in India crosses 600 mark