पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाचे थैमान! जगभरात कोरोनाबळींची संख्या दोन लाखांवर

ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या विषाणूने आतापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त नागरिकांचा बळी घेतला आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी दोन तृतीयांश नागरिकांचा मृत्यू एकट्या युरोपमध्ये झाला आहे. तर एक चतुर्तांश नागरिकांचा मृत्यू अमेरिकेत झाला आहे. तर अमेरिकेत कोरोनाचे एक तृतीअंश रुग्ण आढळले आहेत. 

कोविड-१९:राज्यात ८११ नवे रुग्ण, एका दिवसातील आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा

चीनच्या वुहान प्रांतातून सुरु झालेल्या कोरोनो विषाणूने जगभरात हाहाकार माजवला आहे. या विषाणूमुळे जगभरातील २,०३,२७२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर २९ लाखांपेक्षा जास्त लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. यामध्ये अमेरिकेत आतापर्यंत सर्वात जास्त ५३,५११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर या विषाणूची लागण झालेले ८,३६,५११ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. 

कोविड -१९: देशात आतापर्यंत २० टक्के रुग्ण कोरोनामुक्त!

मिळालेल्या आकडेवारीनुसार, जगात अमेरिका कोरोना विषाणूमुळे सर्वात जास्त प्रभावित देश आहे. याठिकाणी कोरोनाची लागण झालेल्या ५३,५११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ९,२४,५७६ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यामधील ९९,३४६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर इटली कोरोनामुळे प्रभावीत झालेला देश आहे. याठिकाणी २६,३८४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १,९५,३५१ नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. 

मुंबई-पुण्यात १८ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे