पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनामुळे जगात २ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू

कोरोना विषाणूमुळे जगभरातील मृत्यूचा आकडा २ लाखांवर गेला आहेत.

कोरोना विषाणूमुळे जगभरातील मृत्यूचा आकडा २ लाखांवर गेला आहेत. यामध्ये दोन तृतीयांश मृत्यू हे युरोपमधील आहेत. जॉन हॉपकिन्स यूनिवर्सिटीने ही माहिती दिली. यूनिवर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टिम सायन्स अँड इंजिनिअरिंगकडून (सीएसएसई) संकलित आकडेवारीनुसार, शनिवारी रात्री सुमारे ११.४० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) एकूण २,००,६९८ जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. तर कोरोना बाधितांचा आकडा हा २८,६५,९३८ झाला आहे. यामध्ये ८,१०,३२७ जण संक्रमणमुक्त झाले आहेत. 

संकटाच्या काळातही काही जणांकडून राजकारण, CM ठाकरेंची टीका

अमेरिकेत सर्वाधिक मृत्यू

आकडेवारीनुसार, जगात अमेरिकेला या विषाणूचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथे ५२,७८२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर संक्रमित रुग्णांची संख्या ही ९,२४,५७६ झाली आहे. यामध्ये ९९,३४६ जण संक्रमण मुक्त झाले आहेत. कोविड-१९ चा सर्वाधिक फटका बसलेल्यामध्ये इटलीचा दुसरा क्रमांक लागतो. येथे २६,३८४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १,९५३५१ लोक यामुळे संक्रमित झाले आहेत.

ट्रक डायव्हर मित्रांकडे पत्ते खेळायला गेला, २४ जणांना कोरोनाची लागण

याचप्रकारे स्पेनमध्ये २,२३,७५९ जण संक्रमित झाले. यामध्ये २२,९०२ जणांचा मृत्यू झाला. फ्रान्समध्ये कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे २२,२७९ जणांना प्राण गमवावे लागले. तिथे १,५९,९५२ प्रकरणे समोर आली.