पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चीन आणि ब्रिटनपेक्षा न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचे रुग्ण जास्त, ७००० जणांचा मृत्यू

कोरोना विषाणूबाधित रुग्णावर उपचार सुरु असतानाचे संग्रहित छायाचित्र

अमेरिकामध्ये कोविड-१९ चे केंद्र असलेल्या न्यूयॉर्क शहरात कोरोना विषाणूचा वेगाने प्रसार झाला असून तेथील बाधितांची संख्या ही एक लाखांहून अधिक झाली आहे. ही संख्या चीन आणि ब्रिटनमधील संक्रमित लोकांपेक्षा जास्त आहे. न्यूयॉर्कमध्ये रविवारी किमान ५६९५ नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर शहरातील कोरोना विषाणूबाधितांची संख्या वाढून १०४४१० हून अधिक झाली आहे. २७६७६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरात कोरोना विषाणूमुळे ६८९८ लोकांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोनाशी लढा, पुण्यात खासगी डॉक्टरांच्या सेवा सरकारकडून अधिग्रहीत

न्यूयॉर्क शहरात कोरोना विषाणूबाधितांची संख्या ही चीन आणि ब्रिटनपेक्षाही जास्त झाली आहे. 'जॉन्स हॉप्किन्स यूनिवर्सिटी'नुसार ब्रिटनमध्ये ८५२०८, चीनमध्ये ८३१३५ आणि इराणमध्ये ७१६८६ लोक या विषाणूमुळे बाधित झाले आहेत. अमेरिकेत एकूण ५५७३०० लोक या विषाणूमुळे संक्रमित झाले आहेत. तर २२००० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा देशवासियांना संबोधित करणार

जागतिक स्तरावर कोविड-१९ प्रकरणांची संख्या १८ लाखांहून अधिक झाली आहे. यात आतापर्यंत ११४१८५ जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये १८९००० प्रकरणे समोर आली आहेत. ९३८५ जण दगावले आहेत. 

दिल्ली, एनसीआरला २४ तासांत दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का

न्यूयॉर्क शहराचे महापौर बिल डी ब्लासियो म्हणाले की, आम्ही ज्या शत्रूशी लढत आहोत. आम्ही त्याला कधीच त्याला कमी लेखलेले नाही. कोरोना विषाणू खतरनाक आहे. त्यांनी आमच्यासमोर अशी आव्हाने उभी केली आहेत की, ज्याचा आम्ही कधीच सामना केला नव्हता.