पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हवेत आर्द्रता जास्त असल्यास कोरोनाचे संक्रमण घटते, नवे संशोधन

कोरोना विषाणूच्या संक्रमणाची जगातील माहिती अभ्यासून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

जास्त आर्द्रता असलेल्या हवेमध्ये कोरोना विषाणूंचे संक्रमण होण्याची शक्यता कमी असते. अमेरिकेत करण्यात आलेल्या एका संशोधनातून ही माहिती पुढे आली आहे. याच संशोधकांनी येत्या काही महिन्यात आशियातील देशांमध्ये मान्सूनची सुरुवात होईल. त्यावेळी कोरोना विषाणूचा संसर्ग आणखी कमी होईल, असे म्हटले आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत भारतात १३ जणांचा मृत्यू झाला आहे तर जगात ही संख्या २०००० इतकी आहे.

कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय; राज्यात १२४ रुग्ण, मुंबईत दोघांची भर

कोरोना विषाणूच्या संक्रमणाची जगातील माहिती अभ्यासून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. २२ मार्चपर्यंतची माहिती संशोधकांनी अभ्यासली. मॅसॅच्युसेट इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील दोन अभ्यासकांनी हे संशोधन केले. त्यातून त्यांना असे दिसून आले की कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा तापमान आणि हवेतील आर्द्रता या दोन्हींशी संबंध असतो. या संशोधकांना असेही दिसून आले की तापमान ३ ते १७ डिग्री असलेल्या देशांमध्ये कोरोना विषाणूबाधित ९० टक्के रुग्ण आढळून आले आहेत. 

लॉकडाऊनचा परिणाम, देशातील १०२ शहरांतील हवेची गुणवत्ता सुधारली

या संशोधनातील एक संशोधक युसूफ जमील यांनी म्हटले आहे की, तापमान, हवेतील आर्द्रता आणि कोरोना विषाणूचे संक्रमण यांचा संबंध परिस्थितीनुसार बदलतो. कोरोना विषाणूचे संक्रमण आणि तापमान यांचा एकमेकांवर खूप परिणाम होतो असे दिसत नाही. सध्या अमेरिकेतील फ्लोरिडा, लुईसियाना तसेच ब्राझील, भारत, मलेशिया येथील तापमान उष्ण आहे. तरीही तिथे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. पण हवेतील आर्द्रता जास्त असल्यास त्याचा या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो. माझ्या पेपरमधून मी हेच सांगितले आहे. अर्थात त्यावर प्रयोगशाळेत आणखी संशोधन होणे गरजेचे आहे.