पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाशी लढ्यासाठी सरकार मिशन मोडमध्ये, ५०० कंपन्यांची निवड पूर्ण

कोरोना टेस्ट

कोरोना विषाणूच्या संक्रमणाला अटकाव घालण्यासाठी केंद्र सरकारने औषधनिर्मिती, डायग्नोस्टिक्स व्हेंटिलेटर्स, प्रोटेक्शन गिअर, प्रतिबंधक औषध फवारणी या क्षेत्रातील तब्बल ५०० कंपन्या, संस्थांची निवड निश्चित केली आहे. यामध्ये स्टार्टअप्स, संशोधन संस्था, प्रयोगशाळा, उच्च शिक्षण संस्था आणि उद्योग या सर्वांचा समावेश आहे. देशात कोरोनाला लवकर अटकाव करण्यासाठी या सर्वांची एकत्रितपणे मदत लागणार आहे. 

कच्चे तेल पाण्यापेक्षाही स्वस्त, १८ वर्षांच्या नीचांकावर

गेल्या आठवड्यात केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने या संदर्भात एक आवाहन केले होते. त्यानंतर सरकारकडे सुमारे २०० कंपन्या, संस्थांनी अर्ज केले होते. या २०० अर्जांपैकी २० कंपन्यांच्या उत्पादनांचा, सेवांचा लगेचच वापर करून घेण्याचा सरकारचा विचार आहे. यामध्ये संबंधित कंपन्यांची उत्पादने, सेवा यांची निर्मिती क्षमता याचा प्राधान्याने विचार करण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, पुण्यातील स्टार्ट-अपला टेस्टिंग किट्स तयार करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. आता टेस्टिंग किट्सची निर्मिती वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. आठवड्याला एक लाख टेस्टिंग किट्स तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. विशाखापट्टणम येथे व्हेंटिलेटर्स, इमेजिंग इक्विपमेंट्स, रेडिओलॉजी इक्विपमेंट्सची निर्मिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल. 

मुदत संपलेल्या ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बुकला ३० जूनपर्यंत मुदतवाढ

कोरोना विषाणू प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी सशोधन करण्याला सुरुवात झाली आहे. तीन भारतीय कंपन्या यावर काम करीत आहेत, असेही या निवेदनात म्हटले आहे.