पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निकोटिनमुळे कोरोनाचे संक्रमण रोखले जाऊ शकते, नवे संशोधन

इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये गेल्या महिन्यात एक संशोधन प्रसिद्ध झाले होते.

निकोटिनमुळे कोरोना विषाणूचे संक्रमण काही प्रमाणात रोखले जाऊ शकते, अशी माहिती फ्रान्समध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनातून पुढे आली आहे. अर्थात याचा कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये वापर केला जाऊ शकतो का, याची चाचणी अद्याप करण्यात आलेली नाही. 

कोरोनाचा वेग मंदावला, काही आठवड्यांत मात करण्याची आशा: हर्षवर्धन

पॅरिसमधील एका मोठ्या रुग्णालयामध्ये या संदर्भात संशोधन करण्यात आले. त्यामध्ये एकूण ३४३ कोरोनाबाधित रुग्णांची माहिती जमा करण्यात आली. त्यापैकी १३९ रुग्णांमध्ये सौम्य प्रकारची लक्षणे होती. या रुग्णांमध्ये धुम्रपान करणाऱ्यांची संख्या देशाच्या एकूण धुम्रपान करणाऱ्या नागरिकांच्या तुलनेत खूप कमी होती. संशोधनासाठी तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांपैकी केवळ पाच टक्केच रुग्ण हे धुम्रपान करणारे असल्याचे आढळले, अशी माहिती या रुग्णालयातील मेडिसीन विभागाचे प्राध्यापक आणि संशोधनाचे सहलेखक जाहिर अमूरा यांनी दिली.

किम जोंग उन यांच्याबद्दलचे ते वृत्त डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळले

इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये गेल्या महिन्यात एक संशोधन प्रसिद्ध झाले होते. हे संशोधन चीनमधील होते. चीनमधील कोरोनाबाधित १००० रुग्णांमध्ये १२.६ टक्के रुग्ण हे धुम्रपान करणारे होते. चीनमध्ये एकूण लोकसंख्याच्या तुलनेत धुम्रपान करणाऱ्यांची संख्या २६ टक्के इतकी आहे. कोरोना विषाणूचा शरीरातील पेशीमध्ये शिरकाव करणे निकोटिनमुळे रोखले जाऊ शकते, असे या संशोधनामागील आधार आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:coronavirus update France testing if nicotine can protect people from contracting Covid 19