पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डॉक्टरच कोरोनाग्रस्त, उपचार घेतलेल्यांना क्वॉरंटाईनच्या सूचना

दिल्लीतील डॉक्टरलाच कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी (संग्रहित)

देशातील कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६०० पेक्षा अधिक झाला असताना देशाच्या राजधानीत कोरोनाबाधित रुग्णांवर उचार करणाऱ्या डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे.  दिल्लीतील 'मोहल्ला क्लिनिक'मधील एका डॉक्टरचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे दिल्ली सरकारचा ताण आणखी वाढला आहे.

गुजरातमध्ये कोरोनाचा दुसरा बळी!

दिल्लीमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती देण्यात आली असून संबंधीत डॉक्टरकडे तपासणीसाठी आलेल्या लोकांना होम क्वॉरंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे. १२ मार्च ते १८ मार्च दरम्यान दिल्लीतील मौजपूर परिसरातील क्लिनकमध्ये तपासणी केलेल्यांनी १५ दिवस क्वॉरंटाईनचा सल्ला देण्यात आलाय. 
आपने जारी केलेल्या सूचनेनुसार, दिल्ली येथील मौजपूर येथील मोहल्ला क्लिनिकमधील डॉक्टर कोरोनाग्रस्त असल्याची पुष्टी झाली आहे. १२ मार्च ते १८ मार्च या कालावधीत जे लोक या क्लिनकमध्ये तपासणीसाठी आले होते त्यांनी आपल्या घरातून बाहेर पडू नये. जर कोरोना विषाणूची कोणतीही लक्षणं आढळली तर त्वरित जिल्हा शाहरदा रुग्णालयात संपर्क साधावा.

लॉकडाऊन: १४ एप्रिलपर्यंत सर्व गाड्या रद्द, रेल्वेचा मोठा निर्णय

यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला होता. अत्यावश्यक सेवेत आहेत त्यांना परवाने देण्यात येत आहेत. ज्यांच्याकडे ओळखपत्र नसेल त्यांच्यासाठी मदत कार्यालय उपलब्ध करुन देणार आहोत. लॉकडाऊनच्या काळात दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळतील, असेही केजरीवालांनी स्पष्ट केले होते.  
कोरोना विषाणू संपर्काच्या माध्यमातून वेगाने पसरत असल्यामुळे देशावर लॉकडाऊनची परिस्थिती ओढावली आहे. लॉकडाऊननंतर कोरोना विषाणूच्या संक्रमणावर नियंत्रण मिळेल, अशी आशा आहे. त्यासाठी नागरिकांनी सरकार आणि प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. नागरिक पुढील काही दिवसांत कसा प्रतिसाद देणार यावरच सर्व काही अवलंबून आहे.

कोरोनाविरोधात लढ्यासाठी राज्यात २२,११८ खोल्या सज्ज : अशोक चव्हाण