पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... या खासगी लॅबना कोरोना विषाणू शोध चाचणी करण्यास मंजुरी

आयसीएमआरने रविवारी सहा तर सोमवारी दहा पॅथॅलॉजी लॅब्सना कोरोना विषाणू शोध चाचणी सुरू करण्याला मंजुरी

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) देशातील एकूण १६ खासगी लॅबना कोरोना विषाणू शोध चाचणी सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. यामध्ये दिल्लीतील डॉ. लाल पॅथलॅब्स, डॉ. डॅंग लॅब, इंद्रप्रस्थ अपोलो यांचा समावेश आहे. आयसीएमआरने रविवारी सहा तर सोमवारी दहा पॅथॅलॉजी लॅब्सना कोरोना विषाणू शोध चाचणी सुरू करण्याला मंजुरी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा देशाला संबोधित करणार

सध्या केवळ परदेशातून प्रवास करून आलेले नागरिक, त्यांच्या नजीकच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि ज्यांच्यामध्ये लक्षणे नेमकेपणाने दिसताहेत. त्याच रुग्णांची चाचणी करता येईल. या निकषांमध्ये आयसीएमआरने कोणताही बदल केलेला नाही. काही जणांनी आयसीएमआरच्या या निकषांवर टीका केली. मोठ्या प्रमाणात नागरिकांची चाचणी केली पाहिजे. जेणेकरून लवकरात लवकर कोरोना विषाणूबाधित रुग्ण समोर येतील आणि या रोगाचा प्रसार रोखला जाईल. काही जणांनी दक्षिण कोरियाचे उदाहरणही दिले आहे. दक्षिण कोरियामध्ये काही मिनिटांमध्ये रुग्णाचे स्वॉब घेतले जातात आणि दुसऱ्या दिवशी लगेचच त्याचा निकाल दिला जातो.

कोरोना संकट वाढल्यामुळे प्रोटेक्टिव्ह सूट्स तयार करणाऱ्यांचा देशात शोध

तामिळनाडूतील वेल्लोर येथील डिपार्टमेंट ऑफ क्लिनिकल व्हायरोलॉजी आणि चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमधील डिपार्टमेंट ऑफ लॅबोरेटरी सर्व्हिसेस यांना, मुंबईमधील एसआरएल लिमिटेडला, हरियाणातील स्ट्रॅंड लाईफ सायन्सेस आणि एसआरएल लिमिटेड यांना मंजुरी देण्यात आली आहे. गुजरातमधील सुप्राटेक मायक्रोपॅथ लॅबोरेटरी व रिसर्च इन्स्टिट्यूट यांना हैदराबादमधील अपोलो हॉस्पिटल यांना मंजुरी देण्यात आली आहे.