पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'देशातील ८० जिल्ह्यात १४ दिवसांत एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही'

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव आगरवाल

गुरुवारपासून आजपर्यंत ४९१ जण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. बरे होणाऱ्यांची संख्या आता ४७४८ झाली आहे. भारताचा रिकव्हरी रेट हा २०.५७ टक्के इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली. मागील २८ दिवसांत ज्या जिल्ह्यात एकही कोरोनाचे प्रकरण समोर आले नाही, त्यात आणखी १५ जिल्ह्यांची भर पडल्याचेही त्यांनी सांगितले.  

धक्कादायक!, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक

अग्रवाल पुढे म्हणाले की, मागील २४ तासांत कोविड-१९ चे १६८४ पॉझिटिव्ह प्रकरणे समोर आली आहेत. देशातील कोरोना बाधितांची संख्या वाढून २३,०७७ इतकी झाली आहे. देशातील ८० जिल्हे असे आहेत, की तिथे मागील १४ दिवसांत एकही प्रकरण समोर आलेले नाही. 

ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्थगित करा : बीसीसीआय

गृह विभागाच्या संयुक्त सचिव सलिला श्रीवास्तव म्हणाल्या की, जो परिसर कंटेन्मेट किंवा हॉटस्पॉट नाही तिथे २० एप्रिलपासून काही सवलती देण्यात आल्या आहेत. परंतु, कारखान्यात कोविड प्रकरण मिळाल्यास कंपनीच्या सीईओस शिक्षा होऊ शकते किंवा कारखाना ३ महिन्यांसाठी सील केला जाईल, अशी चुकीची माहिती पसरली होती. गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र लिहून अशी कोणतीही तरतूद नसल्याचे स्पष्ट केले. 

कोरोनाचा प्रतिकार करण्यात भारतीय मानसिकदृष्ट्या सक्षम - चिनी तज्ज्ञ

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Coronavirus Update 15 districts no new case in 28 days 80 districts no new cases in last 14 days Says Health Ministry