पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... या काळात तिकीट रद्द केल्यास रेल्वेकडून मिळणार १०० टक्के परतावा

रेल्वे (संग्रहित छायाचित्र)

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवासाचे आगाऊ आरक्षित तिकीट १५ एप्रिलपर्यंत रद्द केल्यास प्रवाशांना त्याचा १०० टक्के परतावा मिळणार आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरातच राहावे. अजिबात सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. देशात कोरोना विषाणू संसर्ग झालेल्यांची संख्या २५८ वर जाऊन पोहोचली आहे.

कोरोनामुळे दहावीचा अखेरचा पेपर लांबणीवर!

जर रेल्वे प्रवाशांनी त्यांच्या २१ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीतील रेल्वे प्रवासाचे आगाऊ आरक्षित केलेले तिकीट रद्द केले तर त्यांना त्याचा १०० टक्के परतावा दिला जाईल, असे रेल्वेने स्पष्ट केले. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी रेल्वेने आपल्या तिकीट रक्कम परताव्याच्या नियमांमध्येही आवश्यक बदल तात्पुरत्या स्वरुपात केले आहेत.

कोरोना चाचणी निकषांत ICMR कडून मोठा बदल, रुग्ण वाढण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता संचारबंदी पाळण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद म्हणून भारतीय रेल्वेने देशाच्या सर्व रेल्वे स्थानकांवरून सुटणाऱ्या पॅसेंजर गाड्या शनिवारी रात्री दहा वाजल्यापासून रविवारी रात्रीपर्यंत रद्द केल्या आहेत. मेल आणि एक्स्प्रेस गाड्याही रविवारी पहाटे चार वाजल्यापासून रद्द करण्यात आल्या आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Coronavirus update 100 percent refund for all passengers till April 15 says Indian Railways