पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमेरिकेत कोरोनामुळे २४ तासांत २६०० रुग्णांचा मृत्यू

ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

अमेरिकेत कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. कोरोनाने अमेरिकेत सर्वात जास्त थैमान घातले आहे. कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूने गेल्या २४ तासांमध्ये २६०० नागरिकांचा बळी घेतला आहे. जो अमेरिकेत एका दिवसात मृत्यू झालेल्यांच्या आकड्यापेक्षा सर्वात जास्त आहे. 

मुंबईमध्ये दोन पोलिस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी दावा केला होता की, अमेरिकेत कोरोना विषाणूचा सर्वात वाईट टप्पा पार झाला असल्याचा दावा केला होता. त्यानंतरच अमेरिकेत २६०० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे गुरुवारी २४ तासांत २६०० रुग्णांचा मृत्यू झाला. तर बुधवारी एका दिवसात २२२८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर गेल्या दोन दिवसात मृतांचा आकडा कमी होता. मात्र बुधवार आणि गुरुवारी हा आकडा जास्त वाढला.

देशात कोरोनाबाधितांचा ११ हजार ९३३ वर, ३९२ रुग्णांचा मृत्यू

दरम्यान, कोरोना विषाणूमुळे अमेरिकेत आतापर्यंत २८ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ६ लाख ३ हजार लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू अमेरिकेत झाला आहे. तर, चीनच्या वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. जगभरातील २०० पेक्षा अधिक देशामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. 

पुण्यात आणखी ६ जणांनी गमावला जीव, राज्यातील मृतांचा आकडा १८७ वर

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:coronavirus united states nearly 2600 corona patient deaths in 24 hours says johns hopkins tally