पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गहू दोन, तर तांदूळ तीन रुपये किलोने मिळणार, केंद्राची घोषणा

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

देशामध्ये कोरोना विषाणूने कहर केला असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. याच दरम्यान बुधवारी मोदी सरकारने मोठी घोषणा केली. देशातील ८० कोटी नागरिकांना केंद्र सरकारकडून रेशन दिले जाणार आहे. २ रुपये दराने प्रतिकिलो गहू तर ३ रुपये दराने प्रतिकिलो तांदूळ देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

लॉकडाऊननंतर आयपीएल स्पर्धा रद्द होण्याची शक्यता वाढली

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर पत्रकार परिषद घेत प्रकाश जावडेकरांनी सांगितले की, 'केंद्र सरकार देशातील ८० कोटी लोकांना महिन्याला प्रति व्यक्ती ७ किलो रेशन देणार आहे. तसंच, सरकार २७ रुपयांचे गहू २ रुपये प्रतिकिलो दराने देणार आहे. तर ३ रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ देणार आहे. यावर सरकार १ लाख ८० हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.'

लॉकडाऊननंतर ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, बिग बास्केट यांच्या सेवांवर हा परिणाम

प्रकाश जावडेकरांनी पुढे सांगितले की, कोरोना रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा आहे. लॉकडाऊन दरम्यान, अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका. तसंच, दोन व्यक्तींनी कमीत कमी ५ फूटांचे अंतर ठेवा. नागरिकांनी घरात राहणे गरजेचे आहे. जर तुम्हाला सर्दी, खोकला असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन जावडेकरांनी केले आहे