पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांनाच कोरोना व्हायरसची लागण

कोरोना विषाणू

ब्रिटनमधील संसदेच्या सदस्य आणि तेथील आरोग्यमंत्री नंदीन डॉरिस यांनाच कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याकडूनच जारी करण्यात आलेल्या एका निवेदनामध्ये आपल्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असल्याचे म्हटले आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे मी घरातच थांबणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडींनंतर राहुल गांधींचा मोदींना टोमणा

नंदीन डॉरिस यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यावर आता त्या कोणाच्या संपर्कात आल्या होत्या, याची माहिती तेथील प्रशासनाकडून घेतली जात आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांमध्ये त्या कुठे गेल्या कोणत्या कार्यक्रमात त्या उपस्थित होत्या, तिथे कोण आले होते, या सर्वाची माहितीही घेण्यात येत आहे. 

ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्यामुळे सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी ३७० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले होते. नंदीन डॉरिस या ब्रिटनमधील पहिल्या राजकीय नेत्या आहेत, ज्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. 

मनसेच्या शॅडो कॅबिनेटच्या निर्णयाचेच शिवसेनेकडून वाभाडे

दरम्यान, द टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार नंदीन डॉरिस या गेल्या काही दिवसांत १०० हून अधिक लोकांना भेटल्या होत्या. त्याचबरोबर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचीही त्यांनी भेट घेतली होती, असे या वृत्तात म्हटले आहे.