पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चीनमध्ये एका दिवसात १५००० जणांना कोरोनाची लागण

कोरोना विषाणू

कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १३६८ झाली आहे. विशेष म्हणजे चीनमधील वुहानमध्ये एकाच दिवसात २४२ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे तर १५ हजार नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. चीनमध्ये कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या ६० हजारांच्या घरात जाऊन पोहोचली आहे. जपानमध्ये गुरुवारी कोरोनामुळे पहिला रुग्ण मृत्युमुखी पडला. 

भीमा कोरेगावचा तपास NIA कडे देण्याला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

२००२-०३ मध्ये चीनमध्ये सार्सची लागण मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यावेळी या आजाराने ७७४ जणांचा बळी गेला होता. तर ८१०० रुग्णांना याची लागण झाली होती. त्या तुलनेत कोरोनाची लागण होण्याचे आणि त्यामुळे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जास्त आहे. 

कोरोना : पुण्यातील नायडू रुग्णालयातील सेवेने चिनी प्रवासी भारावला

एकूण २७ देशांमध्ये ५९८०४ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे दिसून आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोना ही आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी असल्याचे आधीच जाहीर केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले, कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता गृहीत धरून भारताने सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजले आहेत. भारताने आवश्यक औषधांचा साठा करून ठेवला असून, आरोग्य विभागातील सर्व यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कोरोना संदर्भातील घडामोडींवर भारतातील आरोग्य विभागातील अधिकारी बारीक लक्ष ठेवून आहेत, असेही त्यांनी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Coronavirus Two third of the globe could be infected by the deadly virus says WHO adviser