पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमेरिकेत कोरोनामुळे २० हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू

ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

अमेरिकेत कोरोना विषाणूचे थैमान वाढत चालले आहे. जगभरात या विषाणूमुळे सर्वात जास्त प्रभावीत झालेला अमेरिका देश आहे. अमेरिकेत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आणि मृतांचा आकडा वाढत चालला आहे. शनिवारपर्यंत या विषाणूने अमेरिकेत २० हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा बळी घेतला आहे. तर इटलीमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत १९ हजार ४६८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १८९५ वर, १३४ नव्या रुग्णात भर

अमेरिकेत शनिवारी रात्रीपर्यंत ५ लाख १० हजार नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोना विषाणूमुळे अमेरिकची अर्थव्यवस्था पूर्णत: कोलमडली आहे. राष्ट्रीय आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील ९५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकं घरात बसून आहेत. तर जवळपास १.६० कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. 

लॉकडाऊनः कर्फ्यू पास मागणाऱ्या पोलिसाचा हातच छाटला

कोरोनामुळे अमेरिकेत राहणाऱ्या ४० पेक्षा जास्त भारतीय अमेरिकन आणि भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर भारतीय असणाऱ्या १५०० पेक्षा अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. न्यूजर्सीमध्ये ४०० तर न्यूयॉर्कमध्ये १००० भारतीय- अमेरिकन नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये १७ जण केरळचे, १० जण गुजरात, ४ पंजाब, २ आंध्रप्रदेश आणि एक ओडिशाचा आहे. 

लॉकडाऊनः मोदी सरकार देशाची तीन झोनमध्ये विभागणी करण्याची शक्यता