पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाचे देशात २८ रुग्ण, आणखी १९ लॅब सुरू करणार - आरोग्य मंत्री

कोरोना विषाणू

भारतात कोरोनाची लागण झालेले बुधवारी सकाळपर्यंत एकूण २८ रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी दुपारी पत्रकार परिषदेत दिली. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना विशेष वॉर्डात ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.

कोरोनामुळे होळी मिलन कार्यक्रमात सहभागी न होण्याचा मोदींचा निर्णय

इटलीहून आलेल्या २१ जणांच्या गटापैकी १६ जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्वांना भारतात गाडीतून फिरवणाऱ्या वाहनचालकालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे, असे सांगून ते म्हणाले, इटलीतूनच आलेल्या आणखी एका भारतीयाला कोरोना झाला. त्याच्यामुळे आग्रामधील त्याच्या कुटुंबीयांनाही कोरोना झाल्याचे दिसून आले.

कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी देशात सध्या १५ प्रयोगशाळा सुरू आहेत. आणखी १९ प्रयोगशाळा वेगवेगळ्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहेत. यापैकी ८ प्रयोगशाळा आजच सुरू होत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

क्रिप्टोकरन्सी वापरण्यावरून बँकांवर घातलेली बंदी सुप्रीम कोर्टाकडून रद

इराणमध्ये कोरोनाचा वेगाने फैलाव होत असल्यामुळे त्या देशात भारताने आपला एक शास्त्रज्ञ पाठवला असून, आणखी ३ शास्त्रज्ञ आजच रवाना होणार आहेत. इराणमध्येही एक प्रयोगशाळा सुरू कऱण्यासाठी भारताकडून आज आवश्यक सामग्री पाठविण्यात येणार आहे, असे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.